'सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Oct-2020
Total Views |

bjp_1  H x W: 0



मुंबई : 
शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी संघर्षाची वेळ आली तरी करू. काल पर्यटन विभागाने नोटीस काढली आणि बारची वेळ वाढवली. मंदिर नाही पण मदिरालयाची वेळ वाढवलीय. मंदिरात कोरोना होतो, मदिरालयात कोरोना होत नाही. उद्धव साहेब तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. देव, देश आणि धर्माची लढाई आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवली पण तुम्ही बदललात उद्धव जी. या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आम्हाला सरकारला वठणीवर आणता येतं, रस्त्यावर उतरून तुम्हाला वठणीवर आणू, असा इशारा विधान सभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. भारतीय जनता पक्षाच्या नवनियुक्त कार्यसमितीची पहिली बैठक आज (८ ऑक्टोबर) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस बोलत होते.




यावेळी फडणवीस म्हणाले की, भारतीय जनता पक्ष संघर्षातून जन्माला आलेला पक्ष आहे. अत्याचाराविरोधात रस्त्यावर येऊन लढणारा, शेतकऱ्यांसाठी शेताच्या बांधावर जाऊन लढणारा आणि समाजासाठी लोकांत मिसळून संघर्ष करणारा भारतीय जनता पक्ष आहे. कोरोना काळातही समाजाचे उत्तरदायित्व घेऊन नेते रस्त्यावर, कार्यकर्ते रस्त्यावर आहेत. जनतेमध्ये कोरोनामुळे भयावह वातावरण आहे, पण या राज्यकर्त्यांना झोप कशी येते?

कोरोनाच्या आजारातही भ्रष्टाचार

महाराष्ट्रात १५ लाख लोक बाधित आहेत. ३८ हजार मृत्यू आहेत. हा अनधिकृत आकडा आहे. अनधिकृत आणि अधिकृत यात जवळजवळ १५ हजारांचा फरक आहे. लोक कीडा-मुंग्यासारखे मरत असताना राज्य सरकारला याच्याशी काही देणेघेणे नाही. त्यांचा फक्त बदल्यांचा धंदा चालला आहे. कोरोनासारख्या महाभयंकर आजाराचाही त्यांनी धंदा केला आहे. कोविडच्या आजारातही यांनी बाजार मंडला आहे. या आजाराने लोक मरत असताना हे राज्यकर्ते मात्र भ्रष्टाचारात गुंतले आहेत. यांच्या काळात कुठे चाललाय महाराष्ट्र माझा, असे खेदाने विचारावेसे वाटते. हा महाराष्ट्र केवळ राज्यकर्त्यांचा नाही. १२ कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र आहे, हे राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे, असेही फडणवीस यांनी ठणकावले.

महिला असुरक्षित


महाराष्ट्रात रोज महिलांवर अत्याचार होत आहेत. कोविड सेंटरमध्येही महिलांवर बलात्कार होत आहेत. महाराष्ट्राची बदनामी तुमच्या कृतीमुळे होत आहे. अनेकदा मागणी करूनही कोविड सेंटरमध्ये अद्याप एसओपी जाहीर केलेली नाही. महाराष्ट्रात बलात्काराच्या घटना झालेल्या पाहिल्या, की महिला नेमक्या कुठे सुरक्षित आहेत, असा प्रश्न पडतो. येथील महिला असुरक्षित असताना राज्यकर्त्यांना काही देणे-घेणे नाही, मात्र हाथरसच्या घटनेचा निषेध करायला येथील राज्यकर्ते रस्त्यावर उतरतात. हाथरसच्या घटनेचा निषेध केलाच पाहिजे. पंतप्रधानांनीही निषेध केला. पण सोयीने रस्त्यावर येणार असाल तर तुमच्यातला दुटप्पीपणा महाराष्ट्रातील जनता कधीही सहन करणार नाही. फेब्रुवारी महिन्यात ७ महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या. पण राज्यकर्त्यांकडून एकाही घटनेचा निषेध नाही. गृहमंत्री हाथरसच्या घटनेवर बोलतात, पण महाराष्ट्रातल्या घटनेवर संवेदनाही व्यक्त करत नाही. अत्याचारातही येथे राजकारण सुरू आहे. राज्यातील महिला तुमच्या भगिनी नाहीत का? केवळ उक्तीतून नव्हे, तर कृतीतून उत्तर द्या, अशी मागणी फडणवीस यांनी केली. भगिनी असुरक्षित आणि सरकार झोपलेले अशी अवस्था असताना, कोण काय बोलताय याचा ताळमेळ नाही, हा तर अत्याचारग्रस्त महिलांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. आता होतोय तेवढा महाराष्ट्राचा अपमान कधी झाला नव्हता, असे फडणवीस उद्वेगाने म्हणाले.


मराठा समाजाची राज्य सरकारकडून दिशाभूल
महाविकासआघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकांविरोधात उभे करण्याचे कारस्थान रचले जात आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. भाजपचे सरकार असताना आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार कायदा केला. हे करताना ओबीसी समजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावण्यात आला नव्हता. मात्र, आताच्या सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले जात आहे. लोकांची समजूत काढता येत नाही म्हणून त्यांच्यात संभ्रम पसरवला जात आहे. यामधूनच मराठा समाजाला आरक्षण द्यायचे मग ओबीसींच्या कोट्यातून द्यायचे का, अशी नवी टूम काढण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@