उपमुख्यमंत्री अजित पवारांसह ६९ जणांना पोलिसांची क्लीन चीट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Oct-2020
Total Views |

Ajit Pawar_1  H
 
मुंबई : मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र राज्य सरकारी बँक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ६९ जणांना क्लीन चीट दिली आहे. मुंबई पोलिसांनी सत्र न्यायालयात यासंदर्भात शेत्वाचा अहवाल सदर केला आहे. या कथित २५ हजार कोटींच्या कथित घोटाळयाप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने वर्षभरानंतर सत्र न्यायालयात हा अहवाल सदर केला. मात्र, याला एडीने विरोध केला आहे.
 
 
ऑगस्ट २०१९मध्ये अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह ६८ जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा नोंदवला गेला होता. त्यानंतर तब्बल १ वर्षानंतर पोलिसांनी याचा ‘क्लोजर रिपोर्ट’ सदर करण्यात आला. २०११मध्ये रिझर्व्ह बँकेने तत्कालिन संचालक मंडळ बरखास्त केले होते. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची नावे होती. आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रावादी यांच्यातील कुरघोडीच्या राजकारणात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहार चर्चेत आला होता. राज्य सहकारी बँकेत २५ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. संचालक मंडळाने नियमांचे उल्लंघन केल्याने बँकेला फटका बसला होता.
 
 
@@AUTHORINFO_V1@@