ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर काळाच्या पडद्याआड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Oct-2020
Total Views |

avinash kharshikar_1 
 
ठाणे : ८० आणि ९०च्या दशकात मालिका, चित्रपटच नव्हे तर रंगभूमीही गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे ठाण्यातील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. वयाच्या ६८व्या वर्षी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. गेले काही दिवस त्यांच्यावर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांच्यासह विनोदी भूमिका तर काही गंभीर भूमिकाही त्यांनी निभावल्या आहेत.
 
 
 
अविनाश खर्शीकर यांनी १९७८ला ‘बंदिवान मी या संसारी’ या चित्रपटाद्वारे त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी ‘जसा बाप तशी पोरं’, ‘आधार’, ‘आई थोर तुझे उपकार’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘चालू नवरा भोळी बायको’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘घायाळ’, ‘लपवाछपवी’, ‘माफीचा साक्षीदार’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘वासूची सासू’, ‘अपराध मीच केला’, ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘लफडा सदन’ ही त्यांची नाटके प्रचंड गाजली.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@