भारतीय कापसाला मिळाला ब्रँड आणि लोगो

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Oct-2020
Total Views |

Cotton_1  H x W
 
नवी दिल्ली : भारतीय इतिहासात प्रथमच कापसाला ब्रँड आणि लोगो मिळाला आहे. जागतिक कापूस बाजारात आता भारताचे प्रमुख सूत ‘कस्तुरी सूत’ म्हणून ओळखले जाणार आहे. कस्तुरी कापूस शुभ्रपणा, चमक, मुलायमपणा, शुद्धता, चमक वेगळेपणा आणि भारतीयतेसाठी ओळखला जाणार. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी दुसऱ्या जागतिक कापूस दिनानिमित्त व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घोषणा केली.
 
 
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी यावेळी सांगितले की, “भारतीय कापसासाठी हा बहुप्रतीक्षीत क्षण आहे. भारतीय कापसाला ब्रँड आणि लोगो मिळाला. जगभर दुसरा कापूस दिन साजरा होत असताना ही महत्त्वाची घटना आहे. कापूस हे प्रमुख व्यापारी पीक आहे, जे ६ दशलक्ष शेतकऱ्यांना उपजिविका प्राप्त करुन देते. भारत कापूस उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमाकांवर आहे. तसेच जगातील सर्वात मोठा कापसाचा ग्राहक आहे. जागतिक कापसापैकी २३% कापसाचे उत्पादन भारतात होते. तर, जगाच्या सेंद्रीय कापसापैकी ५१% उत्पादन भारतात होते. यातून भारताचे शाश्वततेविषयीचे प्रयत्न दिसून येतात.”
 
 
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (CCI) शेतकऱ्यांना कापसासाठी आतापर्यंतची सर्वाधिक किमान आधारभूत किंमत दिली आहे. सीसीआयने ४३० कापूस खरेदी केंद्र उघडली आहेत आणि शेतकऱ्यांना डिजीटल पद्धतीने ७२ तासांमध्ये पैसे दिले जातात. तसेच ‘कॉट- अॅली’ या मोबाईल अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान, पीक परिस्थिती आणि उत्तम शेतीविषयीची माहिती दिली जाते.
@@AUTHORINFO_V1@@