पुण्यात तब्बल २० कोटींचे अमली पदार्थ जप्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Oct-2020
Total Views |

Drugs_1  H x W: 
पुणे : पुण्यातील खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे अमली पदार्थ विरोधी पथकाने तब्बल २० किलो अमली पदार्थ जप्त केले आहेत. नोएडावरून हे अमली पदार्थ राज्यात विक्रीसाठी आणण्यात आले होते. या कारवाईदरम्यान पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबईत चालू असलेल्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईनंतर आता पुण्यातही हा प्रकार समोर आला आहे.
 
 
खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आणण्यात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचत पथकाने चाकण-शिक्रापुर रोडवरील दशमेश ढाब्याजवळ एका गाडीमधून आलेल्या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २० किलो अमली पदार्थ जप्त केले आहेत.
 
 
या पदार्थांची एकूण किंमत २० कोटींच्या घरात असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाने दिली आहे. यावेळी अटक करण्यात आलेले तीन तरुण स्थानिक आहेत तर दोघे नोएडाचे आहेत. त्यामुळे या प्रकरणात अजूनही मोठी साखळी समोर येण्याची शक्यता असल्याचे पथकाचे सांगिलते आहे. त्यादृष्टीने अधिक तपास सुरू आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@