पीडितेच्या भावाच्या फोनद्वारे आरोपीशी १०४ वेळा संभाषण !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Oct-2020
Total Views |
Hathras _1  H x
 
 



सीडीआर रिपोर्टमुळे खळबळ

पाटणा : हाथरस प्रकरणी १९ वर्षीय पीडितेसोबत झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे देशभरात संतापाचे वातावरम आहे. पीडितेवर मध्यरात्री अंत्यसंस्कार केल्यामुळे नाराजी असताना आता महत्वाचे धारेदोरे या प्रकरणात उघड होत आहेत. या प्रकरणातील आरोपी संदीप आणि पीडित तरुणीच्या भावात झालेल्या फोन कॉल्सची माहितीचा सर्वात मोठा खुलासा झाला आहे.
 
 
 
१३ ऑक्टोबर २०२० पासून मार्च २०२० पर्यंत १०४ वेळा दोघांमध्ये संभाषण झाले होते. एकूण संभाषण हे पाच तासांचे आहे. दोघांचे घर हे अवघ्या दोनशे किमी अंतरावर आहे. ६२ फोन आरोपी संदीपने ४२ फोन पीडितेच्या भावाने केले आहेत. सीडीआर रिपोर्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, याबद्दल अद्याप पोलीसांकडून दुजोरा मिळालेला नाही.
 
 
अधिकाऱ्यांच्या मते, पीडितेच्या भावाचा फोन त्याची पत्नी वापरत होती. त्याच फोनद्वारे पीडित आणि संदीप यांच्यात चर्चा झाली असावी. दोन्ही सीडीआर रिपोर्टमध्ये ६० फोन झाले असून रात्रीच्या वेळी हे फोन झाले आहेत. एसआयटीला गृहविभागाने १० दिवसांची वेळ दिली आहे. या प्रकरणी अद्याप सुरू असल्याने अधिकृत वक्तव्य कुणीच केलेले नाही.
 
 
चंदपा पोलीस ठाण्यात सामाजिक कार्यकर्त्या डॉ. नूतन ठाकुर यांनी पीडितेचे नाव जाहिर करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी संबंधित ट्विटर अकाऊंट्स आणि वेबसाईट्सवर कारवाई केली आहे. या प्रकरणी कलम २२८ अ आणि ७२ आयटी अँक्ट अंतर्गत खटला दाखल झाला आहे. २९ सप्टेंबर रोजी ही तक्रार करण्यात आली आहे. ट्विटरवर पीडितेच्या नावाचे हॅशटॅग्स व्हायरल करणारे, माहिती देताना तिचे नाव बाहेर पसरवणारे यांच्यावर ही कारवाई होणार आहे. पीडितेचा फोटो शेअर करणाऱ्यांविरोधात ही माहिती मागवण्यात आली आहे.
@@AUTHORINFO_V1@@