रियाचा जामीन मंजूर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Oct-2020
Total Views |

Rhea Chakravarti_1 &
 
 
मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरण आणि ड्रग्स कनेक्शन प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह तिचा भाऊ शौविक आणि इतर ६ जणांना अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात जमीन मिळावा म्हणून अर्ज केला होता. बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने रियाच्या जामिनाला सशर्त मंजुरी दिली आहे. तसेचम, नियम तोडून तिचा पाठलाग केल्यास मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल असे मुंबई पोलिसांनी सांगितले.
 
 
पोलिसांच्या परवानगीशिवाय मुंबईबाहेर प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. रियाची १ लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. रियासोबत सुशांतचे कर्मचारी सॅम्यू्ल मिरांडा आणि दिपेश सावंत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीला जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला. तसेच अब्दुल परिहार याचाही जामीन नाकारण्यात आला.
 
 
@@AUTHORINFO_V1@@