विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध सूर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2020
Total Views |

suryadatta_1  H


विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवून गेली दोन दशके ‘सूर्यदत्ता’ एकनिष्ठपणे काम करत आहे. ‘एसजीआय’ देशातील उच्च पदवी असलेल्या विद्यापीठांशी संलग्न आहेत.


सूर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशन’अंतर्गत १९९९ मध्ये ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’ची स्थापना करण्यात आली. आव्हानात्मक आणि दोलायमान जागतिक अर्थव्यवस्थेत यशस्वी होण्यासाठी स्व-प्रवृत्त व्यवसाय व्यवस्थापक आणि उद्योजक विकसित करण्याच्या उद्देशाने या इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवून गेली दोन दशके ‘सूर्यदत्ता’ एकनिष्ठपणे काम करत आहे. ‘एसजीआय’ देशातील उच्च पदवी असलेल्या विद्यापीठांशी संलग्न आहेत. त्याचप्रमाणे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र सरकार आणि मानव संसाधन विकास मंत्रालयाने मान्यता दिली आहे. ‘एसजीआय’च्या घटकांना ‘आयएसओ ९००१:२०१५’ एनव्हीटी-क्युसी, एएनएबी आणि आयएएफची मान्यता आहे. एसजीआयच्या प्रमुख संस्था नॅकद्वारे अधिकृत आहेत आणि विविध शाखांमध्ये भारताच्या प्रमुख शाळा आणि महाविद्यालये आहेत. ‘टाईम्स ग्रुप’ने ‘सूर्यदत्ता’ला भारतातील पहिल्या ५० शैक्षणिक संस्थांमध्ये स्थान दिले आहे. त्याचप्रमाणे ‘एआयसीटीईसीआयआय’ उद्योग तांत्रिक संस्थांशी जोडलेल्या क्रमवारीत संस्थेने सलग पाच वर्षे रौप्य श्रेणीत स्थान मिळवले आहे. ‘अनफोल्ड हिडन पोटेन्शिअल’च ‘ब्लाईंडफोल्ड’ आणि २४ हावर्स सायलेंट ब्रिडेथॉन या उपक्रमांद्वारे संस्थेने ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये स्थान मिळवले आहे. पहिल्या उपक्रमात अंध मुलांना दैनंदिन आयुष्यातील अडचणींची माहिती करुन देणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यावर भर देण्यात येतो. तर दुसर्‍या उपक्रमात २४ तास विद्यार्थ्यांच्या वाचन, चिंतन, शंकांचे निरसन यावर भर देण्यात येतो. ११०० तुळशीच्या रोपांनी भारताचा नकाशा साकारणे आणि ‘काव्याथॉन २०१९’ या दोन उपक्रमांची नोंद ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली आहे.



राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांशी संलग्नता : विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि परिवर्तनीय शिक्षणाचा अनुभव हे ‘सूर्यदत्ता’च्या शिक्षणाचे वैशिष्ट्य आहे. सहभागींची शैक्षणिक, व्यवसायिक आणि वैयक्तिक प्रगती ही प्रभावी शिक्षण, ऑनलाईन शिक्षण, गुणवत्ता व्यवस्थापन मालिका, प्रकल्प, इंटर्नशिप, शिबिरे, तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, कंपनी भेट, आंतरराष्ट्रीय अभ्यासदौरा, व्यक्तिमत्त्व विकास, व्यावसायिक संवाद यांवर अवलंबून असते. संस्थेकडे प्रख्यात शैक्षणिक भागीदारांची एक मजबूत परिसंस्था आहे. त्यामध्ये एचबीएस ऑनलाईन, हार्वर्ड पब्लिशिंग, आयआयएमबीएक्स, ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन-एआयएमए, लिंकन युनिव्हर्सिटी, मलेशिया, टीसीएस आयन, राऊंड ग्लास वेल बेईंग, केम्ब्रिज बिझिनेस इंग्लिश, एसएपी, डॉ. ए.पी.जे. कलाम ट्रस्ट, सीआयएमएसएमई, बडा बिझिनेस असोसिएशन ऑफ इंटर्नल कंट्रोल प्रॅक्टिशनर्स-युके, रिस्क मॅनेजमेंट असोसिएशन ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना इयत्ता वर्गाच्या पलीकडे शिक्षण देऊन स्थानिक आणि जागतिक क्षेत्राशी संलग्न, सामाजिकदृष्ट्या जबाबदार बनवणे. विद्यार्थी समुदाय आणि भविष्यातील संभाव्य कार्यस्थळांच्या अपेक्षांच्या अनुरुप कार्यक्रम आणि तंत्रज्ञानाचा व्यापक अवलंब ही ‘सूर्यदत्ता’ची वैशिष्ट्यं आहेत. ‘सूर्यदत्ता’ संस्थेने सर्जनशीलता वाढविण्यासाठी आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी ‘इंडस्ट्री ४.० इनोव्हेशन लॅब’ची स्थापना केली आहे.


सशुल्क प्रशिक्षणाची संधी : ‘सूर्यदत्ता शिक्षणसंस्थे’अंतर्गत प्रशिक्षण व्यवस्था उभारत असून, विद्यार्थ्यांना त्याचे मानधन देण्याची तरतूद आहे. ही मुले तासावर, आठवड्यानुसार किंवा सुट्टीच्या दिवशी काम करु शकतात. त्यातून त्यांना प्रात्यक्षिक ज्ञान तर मिळतेच शिवाय, पैसेही मिळतात. संस्थेच्या अंतर्गत अशा स्वरुपाची पेड इंटर्नशिप सुरु करणारी ‘सूर्यदत्ता’ संस्था एक वेगळी आहे. आणखी एक विशेष म्हणजे, संस्थेच्याच विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या नवीन स्टार्टअपमध्ये काम करण्याची संधी येथे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. कोरोना महामारीच्या या काळात २०० दिवसांत १०० स्टार्टअपची निर्मिती झाली असून, त्यामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. ‘लॉकडाऊन’ला संधी मानून या काळात असे १००नवे स्टार्टअप ‘सूर्यदत्ता’च्या माध्यमातून पुढे येत आहेत. प्रशस्त, स्वच्छ कॅम्पसमध्ये आरोग्यदायी आणि शैक्षणिक वातावरणात विद्यार्थ्यांचे स्वागत करताना आम्हाला अभिमान वाटतो. महामारीचे संकट टाळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. शैक्षणिक आवार, कार्यालय आणि वर्गात नियमितपणे निर्जंतुकीकरण केले जात आहे. त्याचप्रमाणे सहा फुटांच्या आंतरनियमाचे पालन केले जात आहे. त्याचप्रमाणे ‘थर्मल स्क्रीनिंग’, वाहनांचे निर्जंतुकीकरण नियमितपणे केले जात आहे. सॅनिटायझर, मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. ‘सूर्यदत्ता’मध्ये शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. संस्थेची सर्व शिक्षकांनी ऑनलाईन शिकवण्याची पद्धत सहजपणे आत्मसात केल्याने संस्थेतील शिक्षणप्रक्रियेत खंड पडलेला नाही. समकालीन आणि ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत आहे. ‘सूर्यदत्ता’ विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून बहुआयामी शिक्षणाचा अनुभव देत आहे.


विद्यार्थ्यांचा वाढता कल :
संस्थेच्या स्थापनेपासून ६० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी आमच्या संस्थेतून पदवी घेऊन बाहेर पडले आहेत. हे सर्व विद्यार्थी देशातील आणि जगभरातील विविध राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. देशाच्या सर्व भागांत विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी ‘सूर्यदत्ता’कडून विविध शिष्यवृत्ती योजना उपलब्ध करुन दिल्या जातात. त्यामुळे ऑनलाईन प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे.


विविध अभ्यासक्रम

बहुविध विषयांवर संशोधन केंद्र (पीएच.डी.), व्यवसाय व्यवस्थापन (एमबीए आणि पीजीडीएम), हॉटेल व्यवस्थापन (बी.एससी हॉटेल व पर्यटन व्यवस्थापन), पदवी अभ्यासक्रम (बीबीए, बीबीए सीए, बीबीए आयबी, बी.कॉम., बी.एससी एनिमेशन, बी.एससी सीएस), बॅचलर इन सायबर अ‍ॅण्ड डिजिटल सायन्स, फाईन आर्टस/परफॉर्मिंग आर्टस/मीडिया आर्टस, पदव्युत्तर पदवी (एमएफए, एम.कॉम आणि एम.एससी सीएस), इंटेरिअर डिझाईन (डीआयडीडी), फॅशन डिझायनिंग (बी.एससी एफडी), इव्हेंट मॅनेजमेंट (डिप्लोमा, अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट), मल्टीमिडीया ग्राफिक्स अ‍ॅण्ड अ‍ॅनिमेशन (बी.एससी एमजीए), ज्युनिअर कॉलेज (अकरावी, बारावी, कला, वाणिज्य, विज्ञान, बायफोकल, आयटी) एसएससी बोर्ड, सीबीएसई बोर्ड (प्ले ग्रुप ते बारावी), डिप्लोमा अ‍ॅन्ड अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा कोर्सेस ऑफ मीडिया अ‍ॅण्ड एंटरटेन्मेंट.
प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पुणे.

करिअर मार्गदर्शनासाठी संपर्क :
 
 अभ्यासक्रमाची माहिती : ९८८१४९००३६

प्रवेशासाठी संपर्क : ८९५६९३२४१८ / ९७६३२६६८२९
@@AUTHORINFO_V1@@