रियासह ६ जणांना २० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2020
Total Views |

Rhea_1  H x W:
 
 
मुंबई : ड्रग्ज प्रकरणात आरोपी असलेल्या रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, अब्दुल बासित परिहार, दीपेश सावंत, जैद विलात्र आणि सैमुएल मिरांडा यांना २० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे. मंगळवारी मुंबईत झालेल्या सुनावणीत हा निर्णय झाला. विशेष सत्र न्यायालयाने हा निर्णय जाहीर केला.
 
 
जामीन मिळवण्यासाठी सर्व आरोपींचा प्रयत्न होता. मात्र हा निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे. पुढील १४ दिवस सर्वांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. रिया सध्या भायखाळा तुरूंगात बंद आहे. तर रिया आणि शौविकने अनेक वेळा न्यायालयात जामिन याचिका दाखल केली होती. मात्र प्रत्येक वेळा कोर्टाने त्यांची जामिन अर्ज फोटाळला आहे. दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला ड्रग्जप्रकरणी ८ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@