योगासन-ध्यानामुळे शारिरीक दुखण्यापासून मुक्ती : अमेरिकेचे संशोधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2020
Total Views |
Yoga_1  H x W:



नवी दिल्ली : वर्षानुवर्षे शारिरीक व्याधींशी निगडीत दुखणे असणाऱ्यांसाठी एक दिलासादायक वार्ता आहे. नुकत्याच एका अभ्यासातून मिळालेल्या माहितीनुसार ध्यान आणि योगासनांच्या मदतीने रुग्णांचे दीर्घकालीन दुखणे आणि तणाव नाहीसा होण्यास मदत होईल, असा दावा करण्यात आला आहे. २०१८ मध्ये 'आय इंडियन जर्नल ऑफ पॅलिएटिव्ह केयर' या संस्थेच्या अहवालानुसार भारतातील १९.३ टक्के लोकसंख्या दीर्घकालीन दुखणे, तीव्र वेदनेशी संबंधित त्रासाने पीडित आहेत. देशाच्या लोकसंख्येचा विचार केला असता ही संख्या १८ ते २० कोटींपर्यंत असू शकते.
 
 
नवा अभ्यास काय सांगतो ?
 
जर्नल ऑफ द अमेरिकन ऑस्टियोपैथिक असोसिएशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, माईंड-फुलनेस बेस्ड स्ट्रेस रिडक्शन (MBSR) कोर्स हा अशा दुखण्यांवर फायदेशीर आहे. MBSR कोर्समुळे भीती, तणाव, चिंता आणि इतर व्याधींशी निगडीत आजार काहीसे बरे होण्यास मदत होते. आठ आठवड्यांच्या या प्रशिक्षणात माइंड-फुलनेस ट्रेनिंग दिली जाते. भारतीय भाषांमध्ये ध्यानधारणा ज्यामुळे आपण स्वतःची एकाग्रता शक्ती वाढवू शकतो. एका उपचार पद्धतीप्रमाणे (थेरपी) ही प्रक्रीया काम करते.
 
 
यामध्ये एकूण सहभागींपैकी ८९ टक्के लोकांनी त्यांच्या वेदना शमवण्यासाठी एक नवी पद्धती मिळाल्याचा अभिप्राय दिला आहे. उर्वरित ११ टक्के लोक सर्वसामान्य लोक होते. वैद्यकीय अधिकारी, प्रशिक्षक आणि तज्ज्ञांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबवण्यात आला होता.
 
ऑस्टियोपॅथिक फिजीशियन सिंथिया मार्स्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, "बरेच जण दीर्घकालीन दुखण्यामुळे आपला आत्मविश्वास गमावतात. अधिक प्रकरणात असे दुखणे ठीक होऊ शकत नाही. त्यांना ही प्रक्रीया कामी येईल." पुढे ते म्हणतात, "एकूणच या पद्धतीमुळे शारिरीक दुखण्याच्या व्याधींवर विनाऔषधे उपचार करून काहीसा दिलासा मिळू शकतो."
 
 
माईंड-फुलनेस बेस्ड स्ट्रेस रिडक्शन (MBSR) म्हणजे काय ?
 
नॉर्थ अमेरिकन जर्नल आणि वैद्यकीय विज्ञानानुसर, माइंडफुलनेस बेस्ड स्ट्रेस रिडक्शन (MBSR) प्रोग्राम तंत्रज्ञानाचा विकास डॉ. जॉन कबात-जिन यांनी १९७४ मध्ये केला होता. त्याचा वापर तणाव नाहिसा करण्यासाठी होत होता. मात्र, त्यानंतर अनेक आजाराशी संदर्भातील रुग्णांवर हीच प्रक्रीया वापरण्यात आली.
 
 
यामुळे चिंता, भीती, आजार, दुखणे, मानसिक संतुलन हरवणे, तणाव, मधुमेह या गोष्टींचा सामावेश आहे. आठ आठवड्यांच्या असेलल्या या कार्यक्रमात दर आठवड्याला अडीच तास पूर्णपणे तणाव नाश करण्यासाठी माहिती दिली जाते.
 
 
भारताची जगाला देण ठरलेली योगासने
 
आहारतज्ज्ञ आणि योग प्रशिक्षक डॉ. शैलजा त्रिवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, योगासनांमध्ये खंड पडू न देता सातत्याने दिनक्रमात सामाविष्ठ केला पाहिजे. अन्यथा पुन्हा व्याधी व दुखण्यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. सतत योगासने केल्यामुळे आत्मविश्वास आणि सकारात्मक उर्जा मिळत जाईल. तसेच आरोग्य ही सृदृढ राहील.
 
 
घरीच करता येणाऱ्या सोप्या व्यायामाच्या पद्धती
 
ताडासन, तिर्यक ताडासन, कटिचक्रासन ही तिन्ही आसने सकाळी रिकाम्या पोटी, केवळ पाणी पिऊन केल्याने फायदा होतो. पाठीची हाडे मजबूत होतात आणि शरीराला सकारात्मक उर्जा मिळत जाते. प्राणायामाचा फायदाही चांगला होऊ शकतो. मात्र, सर्व आसने तज्ज्ञांच्या किंवा प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात करावीत, विशेषतः ज्यांना दीर्घकालीन दुखणे आजार आहेत, त्यांनी यासाठी डॉक्टरांचाही सल्ला घ्यावा.


@@AUTHORINFO_V1@@