मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी ८० हजार बनावट अकाऊंटस्

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2020
Total Views |

Commicioner_1  
 
मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे षड्यंत्र रचण्यात आल्याचा आरोप मुंबई पोलीसा आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचा तपास सुरूवातीला मुंबई पोलिसांनी सुरू केला होता. मात्र, मुंबई पोलिसांना आणि पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या तपासाला बदनाम करण्यासाठी त्या काळात सोशल मीडियावर तब्बल ८० हजार फेक अकाऊंटस् सुरू करण्यात आली होती. त्यामाध्यमातून बदनामी केली गेली.
 
 
“कोरोनाकाळात ८४ पोलिसांचा मृत्यू झाला. ६ हजारांपेक्षा जास्त पोलिसांना करोनाची बाधा झाली, असे असताना मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी, खच्चीकरण करण्यासाठी ही मोहीम चालवली गेली. मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतुने ही मोहीम चालवली गेली. त्याचबरोबर मुंबई पोलिसांचे सुशांत प्रकरणाच्या तपासावरून लक्ष हटवण्याचाही प्रयत्न यातून करण्यात आला. मुंबई पोलिसांची अश्लाघ्य भाषेत बदनामी करणारे असंख्य फेक अकाऊंटस् उघडण्यात आली. सायबर सेल या संपूर्ण प्रकरणाची तपास करत आहे. कायद्याचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.” असे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितले.
 
 
मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने यासंदर्भात एक अहवाल तयार केला आहे. यामध्ये सुशांतची आत्महत्या व मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकारची बदनामी करणाऱ्या पोस्टचा उल्लेख करण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममधून पोस्ट शेअर करण्यात आलेली ही फेक अकाऊंटस् फक्त भारतातीलच नाही. इटली, जपान, पोलंड, स्लोव्हेनिया, इंडोनेशिया, तुर्की, थायलंड, रोमानिया आणि फ्रान्स आदी देशातूनही या पोस्ट करण्यात आल्या आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@