राज्यात हाथरस सारख्या ४७ घटना!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Oct-2020
Total Views |
Chitra Wagh_1  
 


चित्रा वाघ यांनी मांडले दाहक वास्तव


मुंबई : उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये झालेल्या घटनेवरून जाब विचारणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला आता भाजपतर्फे चित्रा वाघ यांनी जाब विचारला आहे. महाराष्ट्रात हाथरस प्रकरणासारख्या एकूण ४७ घटना झाल्या आहेत. उत्तर प्रदेशातील पीडितेबद्दल संवेदना आहेतच. तसेच हाथरस घटनेचं दु:खवेदना, चिड, संताप, निषेध आहेचं पण महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेची काळजी कोण घेणार, असा सवाल त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे.
 
 
“राज्य सरकार स्थापन झाल्यापासून आता वर्ष होत आले तरीही राज्याला अद्याप एक महिला आयोग अध्यक्षा नेमता आल्या नाहीत. राज्याला महिला आयोग अध्यक्षा द्या, यासाठी मी स्वतः १० वेळा मागणी केली आहे. तसेच आठ वेळा पत्रव्यवहारही केला आहे. मात्र त्या संदर्भातील फाईलच गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती स्वतः महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. राज्यात महीलांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या महिला बालकल्याण मंत्रालयाची ही हतबलता असेल तर पुरोगामी महाराष्ट्र महीला सशक्तीकरण, सक्षमीकरण हे फक्त नावापुरतचं का? याचे उत्तर द्या”, असा प्रश्न त्यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे.
 
 
रक्षक बनले भक्षक ?
 
महिला अत्याचारासंदर्भातील एक बातमी ट्विट करत या प्रकरणी सरकारला जाब विचारला आहे. एका महिलेचा लैंगिक छळ करणाऱ्या पोलीसाला अटक करण्यात आली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उत्तर प्रदेश सरकारला हाथरस प्रकरणी जाब विचारला होता, त्याबद्दल बोलताना चित्रा वाघ यांनी टीका केली आहे. घटस्फोटीत महिलेशी शरीर संबंध ठेवल्यानंतर त्याबद्दलची चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या विक्रमसिंह बनाफार या पोलीसाला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे इतरांची धुणी धूवून झाली असतील तर आता राज्यातही लक्ष द्या, असा टोला त्यांनी लगावला आहे.
 
 
वसईत शंभरहून अधिक बलात्कार, दोनशेहून अधिक विनयभंग
 
नालासोपारा येथे १९ वर्षीय युवतीने आत्महत्या केली या प्रकरणी चित्रा वाघ यांनी डीसीपी विजय सागर यांची भेट त्यांनी भेट घेतली. त्यावेळी वसईतील गुन्हेगारी संदर्भात आढावा घेण्यात आला. महिनाभरात वसई झोनमध्ये केवळ शंभरहून बलात्कार तर दोनशेहून अधिक विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. हे दाहक वास्तव महाराष्ट्र सहन करतो आहे, असे त्या म्हणाल्या.
 
 
पिंपरी चिंचवडमध्ये ८७ बलात्कार
 
महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत असताना चित्रा वाघ यांनी ८ महिन्यांत पिंपरी चिंचवडमध्ये ४७ हत्या आणि ८७ बलात्काराचे गंभीर गुन्हे घडले आहेत. त्यावर कोण बोलणार, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
 
 
राज्यपाल व गृहमंत्र्यांची घेतली भेट
 
गृहमंत्री व राज्यपालांची घेतली भेट राज्यातील महिला व अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या लैगिक अत्याचार, कोविड आणि क्वारंटाईन सेंटरसाठी लागू करण्यात येणारी sop लागू करण्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत त्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले आहे. ठोस उपाययोजना न केल्यास मंत्र्यांच्या गाड्या अडवणार असल्याचा ईशाराही त्यांनी दिला आहे.




@@AUTHORINFO_V1@@