उघड्या मॅनहोलमध्ये वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह सापडला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Oct-2020
Total Views |

Manhole accident_1 &
 
 
मुंबई : मुंबईच्या घाटकोपरमध्ये मॅनहोलमध्ये वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह समुद्रकिनारी सापडला. शीतल भानुशाली असे या महिलेचे नाव असून मुंबईच्या पावसामध्ये घरी परतत असताना त्या उघड्या मॅनहोलमध्ये पडून वाहून गेल्या होत्या. हाजीअली समुद्रकिनारी त्यांचा मृतदेह सोमवारी आढळून आला आहे. घाटकोपर परिसरातील असल्फा या ठिकाणी ही दुर्घटना घडली होती.
 
 
शीतल भानुशाली या दळण आणण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्यांच्या नेहमीच्या रस्त्यावर पाणी साचल्याने त्यांनी दुसऱ्या मार्गावरुन जाण्याचा निर्णय घेतला. पण याच दरम्यान उघड्या मॅनहोलमध्ये पडून वाहून गेल्या. अखेर त्यांचा मृतदेह हाजीअली किनारी आढळला आहे. अनेकवेळा मुंबईमध्ये पावसाळ्यात अशा घटना घडत असतात.
 
 
पाण्याचा निचरा होण्यासाठी मॅनहोलची झाकणे उघडी ठेवली जातात. परंतु, अनेक उघड्या मॅनहोलच्या जागेवर सूचना देणारे फलकच नसल्याने असे अपघात घडतात. तीन वर्षांपूर्वी मुंबईत झालेल्या तुफान पावसात बॉम्बे हॉस्पिटलमधील पोटविकारतज्ज्ञ डॉक्टर दीपक अमरापूरकर बेपत्ता झाले होते. यानंतर त्यांचा मृतदेह वरळी समुद्रकिनारी सापडला होता. मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यांचा मृतदेह वरळीजवळ सापडला होता.
 
 
@@AUTHORINFO_V1@@