नोटांद्वारे कोरोनाचा प्रसार होतो का? : RBI म्हणते

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Oct-2020
Total Views |
RBI_1  H x W: 0
 
 
 
नवी दिल्ली : चलनात असलेल्या नोटांमुळे विषाणू एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊ शकतो का या प्रकरणी नुकताच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया - आरबीआय ला प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर आरबीआयने होय, असे उत्तर दिले आहे. त्यामुळे नोटांमुळे कोरोना पसरू शकतो ही शक्यता नाकारता येत नाही. 'कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स'ने (कैट) या प्रकरणी आरबीआयला प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना रिझर्व्ह बँकेने अप्रत्यक्षपणे, असे उत्तर दिले आहे.
 
 
कोरोना काळात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचा आग्रह यापूर्वी केंद्र सरकारकडून देण्यात आला होता. त्यानंतर आरबीआयचा हा इशारा महत्वाचा मानला जात आहे. नोटांद्वारे विषाणू व जीवाणूचा प्रसार होतो का? याबाबत कैटने सातत्याने पापुरावा केला. कैटने ९ मार्च २०२० रोजी केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांना एक पत्र लिहिले होते. त्यात नोटांद्वारे विषाणू पसरू शकतो का, असा सवाल विचारण्यात आला होता. त्याला होय असे उत्तर आले आहे. त्यामुळे नोटांद्वारे कोरोना पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
 
आरबीआय म्हणते, "कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, कार्डसारख्या प्रणालींचा वापर करुन डिजिटल पेमेंट करण्याचे आवाहन केले आहे. चलनी नोटांना पर्यायी पद्धतीचा वापर करावा. एटीएममध्ये जाऊन रोख पैसे काढावे लागणार नाहीत. तसेच प्रशासनाने दिलेल्या विविध सूचनांचे पालन करावे."
 
 
नोटांमुळे कोरोना विषाणू पसरू शकतो का ?
 
"चलनी नोटांद्वारे कोणत्याही प्रकारचे जीवाणू किंवा विषाणूचा जलदगतीने प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्ही या प्रकरणी वर्षभरापासून पाठपुरावा करत आहोत. त्यानुसार आरबीायने याला थेट उत्तर दिलेले नाही. परंतू नोटांद्वारे विषाणू प्रसार होऊ शकतो ही शक्यताही नाकारलेली नाही.", असे कैटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले.
 
 
वेळोवेळी सावध करण्याचा प्रयत्न
 
कोरोना महामारीची सुरुवात झाल्यानंतर डिजिटल पेमेंट करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. एटीएम किंवा बँकेत येणाऱ्या ग्राहकांनाही या संदर्भात जागरूक केले जात आहे. नोटांद्वारे विषाणूचा प्रसार होत नाही, असे आरबीआयने म्हटलेले नाही. वेळोवेळी सावध करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@