राग चीनचा फायदा भारताला !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Oct-2020   
Total Views |
China_1  H x W:
 



जगात चीन विरुद्ध असणारा राग हा स्पष्टपणे दिसून येत आहे. आणि त्याचाच फायदा भारताला होताना दिसत आहे.




२०१९ या वर्षाला निरोप देताना २०२० मध्ये नवीन आशा उराशी बाळगत जगाने २०२०चे स्वागत केले. मात्र, २०२०च्या मार्च महिन्यापासून जग जणू स्थिरावल्यासारखे झाले. कारण, जगात झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव. कोरोनामुळे मानवी जीवनासमोर जसे आरोग्याचे संकट उभे राहिले तसेच, जगातील नागरिकांसमोर आर्थिक संकटही उभे राहिले. केवळ नागरिकच नव्हे, तर जगातील देशांचे आर्थिक गणितदेखील बिघडले.
 
 
कोरोना महामारीचा उद्गाता म्हणून चीनवर जगातील अनेक राष्ट्रांचा रोष आहेच. त्यातच जगाच्या अर्थकारणाला कोरोनामुळे बसलेला फटका हा चीनवरील रागात अधिकच भर पाडणारा ठरला आहे. कोरोना काळात भारताने जगात एक प्रगल्भ राष्ट्र म्हणून वर्तन केले. आजही करत आहे. त्याचाच फायदा आज जागतिक पटलावर भारताला होताना दिसत आहे. व्यापारउदीम क्षेत्रात भारताला वर्षाच्या सुरुवातीच्या काळात जरी फटका बसला असला तरी, आज भारत आपले पाऊल पुढे टाकत आहे.
 
 
‘वसुधैव कुटुंबकम’ या धर्तीवर असणारी देशाची धोरणे आणि नीती ही केवळ बोलण्यापुरती नाहीत, तर ती आचरणाचा भागही आहेत. हे भारताने या काळात सिद्ध केले. याउलट चीनने भाताशी संघर्ष करणे, जगात अशांतता पसरविणे, पाकधार्जिणे धोरण आखणे यातच धन्यता मानली. या सर्वाची परिणती म्हणून चीनला आज व्यापार क्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागत आहे.
 
 
जगभरात चीनविरूद्ध असणार्‍या रागाचा फायदा होऊन भारताच्या निर्यातीत सप्टेंबरमध्ये मोठी वाढ झाली आहे. नुकतेच केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल म्हणाले की, सहा महिन्यांच्या सलग घटीनंतर सप्टेंबरमध्ये देशाच्या निर्यातीत वार्षिक आधारावर ५.२७ टक्के वाढ झाली आहे. ही निर्यात आता २७.४ अब्ज डॉलरच्या वर पोहोचली आहे. यावेळी गोयल यांनी सांगितले की, निर्यातीची ही पातळी ‘कोविड-१९’च्या पार्श्वभूमीवर पूर्वीच्या व्यापारापेक्षा सप्टेंबर महिन्यात वधारली आहे.
 
 
निर्यात क्षेत्रात होणारी ही वाढ भारतीय अर्थव्यवस्थेतील वेगाने पुनर्प्राप्तीचे लक्षण असल्याचे दिसून येत आहे. गोयल यांनी याबाबत आपली भूमिका मांडताना सांगितले की, ‘मेक इन इंडिया’, ‘मेक फॉर द वर्ल्ड’ या त्यांच्या वाक्यात भारताचा आत्मविश्वास नक्कीच दिसून येत असल्याचे जाणवते. सप्टेंबर २०२०मध्ये भारताच्या निर्यातीत मागील वर्षाच्या याच महिन्याच्या तुलनेत २.२७ टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच, सप्टेंबर २०१९मध्ये २६.०२ अब्ज डॉलरची निर्यात भारताच्यावतीने करण्यात आली होती.
 
 
‘कोविड-१९’ या साथीच्या रोग काळात सर्व देशभर किंबहुना या साथीच्या आजारामुळे आणि जागतिक पातळीवरील मागणीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे निर्यातीत यावर्षी मार्चपासून घट होत होती. पेट्रोलियम, चामड्याचे पदार्थ, अभियांत्रिकी वस्तूंची व रत्ने व दागिन्यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांची निर्यात घटली आहे. निर्यात वसुलीच्या मार्गावर भारतीय व्यापार प्रोत्साहन परिषदेच्या (टीपीसीआय) सप्टेंबर महिन्यातील आकडेवारीला प्रतिसाद देताना त्याचे अध्यक्ष मोहित सिंगला म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आता सुरू झाली असून खरेदीदारांनी ऑर्डर देणे सुरू केले आहे. ते म्हणाले की, अन्न व कृषी क्षेत्राची निर्यात पूर्वीप्रमाणेच सुरू राहील. कारण, त्यांची कामगिरी कमी आहे.
 
 
या सर्वात जगात चीन विरुद्ध असणारा राग हा स्पष्टपणे दिसून येत आहे. आणि त्याचाच फायदा भारताला होताना दिसत आहे. निर्यातदारांची सर्वोच्च संस्था एफआयईओचे अध्यक्ष शरद कुमार सराफ यांच्या मते, भारतीय निर्यातीस चालना मिळणे हे अपेक्षेप्रमाणे घडत आहे. यामागचे कारण असे आहे की, चीनविरोधी देशांकडून भारताला बरीच ऑर्डर मिळाली आहे. ते म्हणाले की, जर भारत कमोडिटी एक्सपोर्ट स्कीम (एमईआयएस), जोखीम निर्यात आणि आरओडीटीईपी (ड्युटीमध्ये सवलत आणि निर्यात उत्पादनांवर कर) सोडवले गेले तर आगामी काळात निर्यातदरांना अधिक सक्रियेतेने काम करणे सहज शक्य होणार आहे. सप्टेंबरमध्ये वर्षाच्या तुलनेत निर्यातीत ५.२७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सलग सहा महिने घसरण होण्यापूर्वी जगभरात चीनच्या नाराजीचा फायदा भारताला होत असल्याचेच यावरून दिसून येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@