राज्यात सोमवारपासून सुरु होणार रेस्टॉरंटस आणि बार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Oct-2020
Total Views |

Hotels_1  H x W
 
मुंबई : सोमवार, ५ ऑक्टोबरपासून राज्यातील रेस्टॉरंटस आणि बार चालू करण्यास राज्य सरकारकडून परवानगी मिळाली आहे. याबाबत नुकतेच पर्यटन संचालनालयामार्फत नियमावली जारी करण्यात आली आहे. मिशन बिगेन अगेनअंतर्गत ५० टक्के क्षमतेनेच हॉटेल, फूड कोर्टस्, रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्यास संमती देण्यात आली आहे. मात्र, जिमसंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच, शाळा आणि महावियालयेदेखील ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहेत.
 
 
राज्य सरकारने जारी केलेल्या नियमांनुसार, हॉटेल, रेस्टॉरंट, बारमध्ये प्रवेश देताना शरिराचे तापमान, सर्दी, खोकला आहे का? हे तपासावे लागणार आहे. लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच प्रवेश द्यावा लागणार आहे. ज्यांच्या शरिराचे तापमान ३८ अंश सेल्सियसच्या वर असेल अशा ग्राहकांची नोंद ठेवून त्यांना प्रवेश नाकारावा लागणार आहे. प्रति व्यक्ती ६ फुटाचे अंतर ठेवावे लागणार आहे. ग्राहकांना सेवा देताना कर्मचाऱ्यांना सुरक्षित अंतराचे पालन करावे लागणार आहे. ग्राहकांसाठी सॅनिटायझर ठेवावे लागणार आहे.
 
 
बील भरताना डिजिटल माध्यमांचा वापर करण्यास सांगावे लागणार आहे. 'रेस्टरूम', हात धुण्याची ठिकाणे वेळोवेळी स्वच्छ करावी लागणार आहेत. प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे मार्ग ठेवावे लागणार आहेत. कॅशियरला वेळोवेळी हात स्वच्छ धुवावे लागणार आहेत. कर्मचाऱ्यांची वेळोवेळी कोविड तपासणी करावी लागणार आहे. एन-९५ किंवा तशापद्धतीचे मास्क वापरावे लागणार. हॉटेल, रेस्टॉरंट दिवसातून दोन वेळा स्वच्छ करावे लागणार आहेत. नियमांचे पालन केले जाते की नाही हे पाहण्यासाठी सीसीटीव्ही लावावे लागणार आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@