खिलाफत चळवळ : काय शिकावे, काय स्मरावे?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Oct-2020
Total Views |

Khilafat Movement_1 
 
अखिल-इस्लामवादाची चर्चा करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिहितात, इस्लाम प्रादेशिक निष्ठा मानत नाही. त्याच्या निष्ठा सामाजिक व मजहबी आणि म्हणून देशबाह्य आहेत... हा अखिल-इस्लामवादाचा आधार आहे. याच्यामुळेच भारतातील प्रत्येक मुसलमान, आपण मुस्लीम पहिले, नंतर भारतीय असे म्हणतो. भारतीय मुस्लीम भारताच्या प्रगतीत इतका अल्प सहभाग घेतो. पण, मुस्लीम देशांच्या हिताचा पाठपुरावा करण्यात तो श्रांत होतो आणि त्याच्या विचारात मुस्लीम देश प्रथम आणि भारत दुसर्‍या जागी असतो, याचे स्पष्टीकरण या भावनेत सापडते.
 
४ फेब्रुवारी, १९२२ ला चौरीचौराला झालेल्या हत्याकांडानंतर गांधींनी असहकार चळवळ अचानक बंद केली. पण, असहकार चळवळ मुळातच खिलाफत चळवळीला दुय्यम होती. खिलाफत चळवळीचे नागडे रूप झाकणे हेच तिचे प्रयोजन होते. खिलाफत चळवळीची पुढील चार मूळ उद्दिष्टे होती - तुर्की साम्राज्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य, आग्नेय युरोपमधील थ्रेसचा प्रदेश तुर्कस्तानला पुन्हा जोडणे, स्मिर्ना (सध्याचे इजमीर शहर) आणि आशिया मायनर (सध्याचे अनातोलिया)च्या किनारपट्टीचा प्रदेश तुर्कस्तानला पुन्हा जोडणे आणि जजिरात-उल-अरब (इस्लामची पवित्र स्थळे असलेला अरबस्तानचा द्वीपकल्प)चे स्वातंत्र्य आणि सुरक्षा. कुठल्याच उद्दिष्टाचा हिंदुस्थानशी अर्थाअर्थी संबंध नव्हता. देशांतर्गत घडामोडींमुळे देशबाह्य निष्ठा असलेल्या चळवळीवर परिणाम होण्याचे काहीच कारण नव्हते. खिलाफत चळवळीची मूळ उद्दिष्टे अद्याप अपूर्ण राहिल्याने ती असहकार चळवळीच्या मुखवट्याविना चालू राहिली.
 
खिलाफतीचा अंत
 
दि. २४ जुलै, १९२३ ला मित्रराष्ट्रे आणि तुर्कस्तानमध्ये लॉसॅन येथे संधी झाली. त्यानुसार कॉन्स्टॅन्टिनोपोल, थ्रेसचा काही भाग आणि सामुद्रधुनी तुर्कस्तानकडेच राहिले. पूर्वीच्या ऑटोमन साम्राज्याच्या मोठ्या प्रदेशावर तुर्कस्तानला पाणी सोडावे लागले असले तरी तिचे बरेचसे बळ अबाधित राहिले. त्यामुळे खिलाफतवाद्यांची पहिली तीन उद्दिष्टे सफल झाली होती. पण, इस्लामी दृष्टिकोनातून चौथे उद्दिष्ट सर्वाधिक महत्त्वाचे होते. त्यामुळे खिलाफत चळवळ चालू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. तुर्की स्वातंत्र्यचळवळीचे नेते आणि तुर्की गणराज्याचे पहिले अध्यक्ष मुस्तफा केमाल अतातुर्क (१८८१-१९३८) खिलाफत उखडून टाकतील हे खिलाफतवाद्यांच्या स्वप्नीही नव्हते. त्यामुळे काही काळ त्यांनी केमालांना पाठिंबाही दिला. पण, मुस्तफा केमालांचे पाणी काही औरच होते. त्यांच्या दृष्टीने खिलाफत ही संस्था कालबाह्य झाली होती. नूतन तुर्की गणराज्यासाठी खिलाफत घातक डोकेदुखी असल्याचे त्यांचे मत होते. इस्लामी जगताच्या रक्षणाचे ओझे स्वतःच्या शिरावर घेण्यात केमालांना स्वारस्य नव्हते. त्यांनी तर इस्लामवादाच्या थडग्यावर खरेखुरे सेक्युलर राज्य बांधण्याचा प्रयोग आरंभिला होता.
दि. ३ मार्च, १९२४ ला खिलाफत संस्था भंग झाली असून, खलिफाला पायउतार झाल्याचे घोषित करण्यात आले. खलिफाची पुरती विटंबना होईल याची केमालांनी काळजी घेतली. शाही परिवाराला तुर्कस्तान सोडण्यासाठी काही तासांचा अवधी देण्यात आला. एकेकाळी इस्लामी जगताचा सर्वोच्च नेता अशी गमजा करणार्‍या खलिफाला नवीन पारपत्र देण्यात आले. कुठल्याही सामान्य व्यक्तीप्रमाणे त्यावर ‘मि. अब्दुल-मेजिद बिन अब्दुल अजीज’ असे त्याचे पदनामाविना नाव टाकण्यात आले. त्याला ‘मुत्सद्दी व्हिसा’ देण्याचे कारण नसल्याचे इटालियन दूतावासाला निक्षून सांगण्यात आले. शुक्रवारच्या खुतब्यातून त्याच्या नावाच्या ऐवजी तुर्की गणराज्याचा उल्लेख केला जाईल, अशी व्यवस्था करण्यात आली. हैदराबादचा निजाम, काही हिंदुस्थानी नवाब, धनदांडगे आणि रेड क्रिसेंट सोसायटी यांनी दिलेल्या तुकड्यांवर उरलेसुरले आयुष्य घालविण्याची पाळी पूर्व खलिफावर आली (द खिलाफत मूव्हमेंट इन इंडिया, १९१९-१९२४, मुहम्मद नईम कुरेशी, लंडन विद्यापीठाला सादर केलेला प्रबंध, १९७३, पृ. २६९-२७१, २७६).
 
खिलाफत चळवळीचा शेवट
 
इस्लामवादाला गाडून टाकण्याचे ऐतिहासिक काम मुस्तफा केमाल तिथे तुर्कस्तानात करत होते, तर इथे खिलाफतवादी नेते अद्याप अखिल-इस्लामवादाच्या मायाजालात अडकले होते! भल्याभल्यांचे वास्तवाचे भान सुटले होते. मुस्तफा केमाल यांनी स्वतःला खलिफा घोषित करावे, असे मौलाना आझादांनी सुचविले! खिलाफतवादी नेते भानावर आले, तेव्हा त्यांच्यात लाथाळ्या सुरू झाल्या. असहकार हा त्यांच्यामधील वादाचा एक विषय होता. विधिमंडळांवर बहिष्कार टाकावा, अशी सेंट्रल खिलाफत कमिटी (सीकेसी) आणि जमियत-उल-उलेमाची अधिकृत भूमिका होती. पण, मौलाना अब्दुल बारी आणि अजमल खान यांच्यासारख्या मंडळींचा त्याला विरोध होता. आपण स्वतःला काँग्रेसच्या दावणीला बांधून घेतल्याची काही खिलाफतवादी नेत्यांची भावना होती. खिलाफतवाद्यांसाठी ब्रिटिशविरोध दुय्यम होता. तुर्की हितसंबंध हेच त्यांच्यासाठी सर्वतोपरी होते. फेब्रुवारी १९२२ मध्ये ब्रिटिश तुर्कस्तानला झुकते माप देतील, असे वाटल्याने मौलाना अब्दुल बारींसारखी मंडळी ब्रिटिशांशी जुळवून घेण्याची भाषा करू लागली. याउलट ब्रिटन हातचे राखून तुर्कस्तानशी व्यवहार करत असल्याचे अनेक खिलाफतवाद्यांचे मत होते. अहिंसेच्या तत्त्वाचे तोंडदेखले गोडवे गाण्याचाही प्रश्न होता. सन १९२२ नंतर वाढत्या प्रमाणात झालेल्या दंग्यांमुळे हिंदू-मुस्लीम एकीचा भंपकपणा उघडा पडला होता. जुलै १९२४ मध्ये बकरी ईदच्या निमित्ताने दिल्लीत जातीय भडका उडाला. त्याच महिन्यात नागपूरला मुस्लिमांनी पुन्हा दंगा केला. पुढल्या महिन्यात पानिपतला दंगा झाला. लाहोर, लखनौ, मुरादाबाद, भागलपूर, रुडकी, आग्रा, हापूर, जामपूर, मेरठ, अहमदाबाद, पिलिभीत, शहाजानपूर, हरदोई, कालपी, प्रयाग, झंग आणि निजामशाहीत गुलबर्गा येथे दंग्यांचे सत्र झाले. डिसेंबर १९२६ मध्ये आर्य समाजाचे नेते आणि शुद्धी चळवळीचे अध्वर्यू स्वामी श्रद्धानंद यांच्या हत्येमुळे हिंदूंमध्ये प्रचंड प्रक्षोभ निर्माण झाला. स्वामीजींच्या खुन्याला ‘भाई अब्दुल रशीद’ म्हणत गांधींनी हिंदू-मुस्लीम एकीचे आपले तुणतुणे चालूच ठेवले असले तरी सामान्य हिंदू आता संतापला होता.
 
खिलाफत निधीमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याची बाब उघडकीस आली. हे घोटाळे नुसते सीकेसीत झाले नसून, अनेक प्रांतांत झाल्याच्या वावड्या उठल्या. एकट्या पंजाबात ४०-५० हजार रुपयांचा अपहार झाल्याचे बोलले जाऊ लागले. खिलाफत निधीच्या कोषाध्यक्षाकडे असलेल्या रु. १६ लाखांहून अधिक रकमेची खासगीरीत्या विल्हेवाट लावण्यात आली होती. खिलाफतवादी नेत्यांची विश्वासार्हता लयाला गेल्यामुळे त्यांना मिळणार्‍या देणग्यांचा ओघ कमी झाला. घोटाळे, गटबाजी, व्यक्तिगत हेवेदावे आणि हिंदू-मुस्लीम झगडा ही खिलाफत चळवळीच्या शेवटच्या पर्वाची वैशिष्ट्ये होती. सन १९२९ नंतर सीकेसी नावापुरती उरली. पण, कोणतीही खिलाफत कॉन्फरन्स झाल्याची नोंद नाही. खिलाफतवादी नेते लहान-लहान गटांत पांगले. डॉ. अन्सारी, मौलाना आझाद, डॉ. महमूद, शेरवानी, किडवाई, असफ अली, अक्रम खान, किचल्यू, डॉ. आलम आणि खलीकुंजमान यांच्यासारख्या तथाकथित राष्ट्रीय मुस्लिमांनी ‘मुस्लीम नॅशनॅलिस्ट पार्टी’ काढली. ‘ऑल इंडिया नॅशनॅलिस्ट मुस्लीम कॉन्फरन्स’च्या झेंड्याखाली ही मंडळी एकत्र येऊ लागली. मुस्लीम लीगशी संधान बांधून अली बंधू, हसरत मोहानी आणि आझाद सुभानी यांच्यासारख्या मंडळींनी ‘ऑल इंडिया मुस्लीम कॉन्फरन्स’ सुरू केली. सन १९२६ नंतर अब्दुल बारी, अजमल खान, डॉ. अन्सारी आणि अली बंधू अल्लाहला प्यारे झाले. सन १९३८ च्या सुमारास खिलाफत चळवळ लुप्त झाली. मुंबईतील ‘खिलाफत हाऊस’ हाच तिचा आज शिल्लक असलेला मूर्त अवशेष (अगोदरच्या परिच्छेदांचा संदर्भ - कुरेशी, उपरोक्त, पृ. २५४-३०५).
 
खिलाफत चळवळीचे महत्त्व
 
खिलाफत चळवळीचा पायाच ठिसूळ असल्यामुळे ती सपशेल फसली यात आश्चर्य नाही. पण, तरीही तिचे महत्त्व समजून घेतलेच पाहिजे. खिलाफत चळवळीपूर्वी मुस्लिमांमध्ये वहाबी आणि फरैजी चळवळी झाल्या असल्या, तरी एका केंद्रीय संस्थेच्या मार्गदर्शनाखाली झालेली मुस्लिमांची पहिली हिंदुस्थानव्यापी चळवळ म्हणून तिचा उल्लेख करावा लागेल. मुंबई, बंगाल आणि संयुक्त प्रांतात आधीपासूनच मुस्लीम राजकारणाची परंपरा होती. या चळवळीमुळे पंजाब, सिंध आणि वायव्य सीमा प्रांतातील मुस्लीम राजकीयदृष्ट्या जागृत झाले. सन १८५७ च्या उठावानंतर उच्च आणि मध्यमवर्गीय मुस्लीम राजकारणात सक्रिय झाले. खिलाफत चळवळीमुळे उलेमा मुस्लीम राजकारणाच्या शिरोभागी आले नि इंग्रजाळलेल्या मुस्लीम राजकारण्यांशी ते एक झाले. खिलाफत चळवळीने सामान्य मुस्लीम जनतेला एकत्र आणले. काँग्रेसचे सर्वेसर्वा होण्यासाठी गांधींना खिलाफत चळवळीत उडी घ्यावीशी वाटली, यावरूनही मुस्लीम एकी किती प्रभावी होती हे लक्षात यावे.
 
खिलाफत चळवळीची अनेक अपत्ये निपजली. सन १९२३ मध्ये डॉ. किचल्यू यांनी सुरू केलेली जमियत-ई-तंजीम (संघटन) चळवळ सीकेसीने पुढील वर्षी स्वीकारली. शौकत अली तिचे प्रमुख नेते झाले. मुस्लीम जत्थे उभारणे, मशिदींत शाळा उघडणे, पाठ्यपुस्तकांची निर्मिती, मशिदींतील खुत्बे तयार करणे, नमाजाच्या वेळा पाळणे, तांत्रिक आणि व्यावसायिक महाविद्यालयांची स्थापना, वक्फ आणि जकातवर देखरेख, विधवा आणि अनाथ मुलांची साहाय्यता, मुस्लीम सहकारी संस्था व बँकांची स्थापना, असा सर्वंकष कार्यक्रम तंजीमला अभिप्रेत होता. सन १९१९ मध्ये जमियत-उल-उलेमा हिंद (हिंदच्या विद्वानांची संघटना) स्थापन झाली. सुरुवातीला तिच्यात विविध इस्लामी न्यायप्रणालींचे उलेमा सहभागी झाले. नंतर मात्र ही संघटना देवबंदी हनफी न्यायप्रणालीच्या उलेमाचे राजकीय अंग बनली.
 
 
गांधी आणि खिलाफतवाद्यांमधील मधुर संबंधांमुळे हिंदू-मुस्लीम एकीचा आभास निर्माण झाला. ही चळवळ स्वराज्यप्राप्तीसाठी असल्याच्या भ्रमात हिंदू राहिले. हा भ्रम आजही दूर झालेला नाही. हिंदू-मुस्लीम एकीशिवाय स्वराज्यप्राप्ती अशक्य असल्याचे हिंदूंच्या मनावर बिंबविले गेले. आत्मविस्मृत हिंदू समाज आत्मविश्वासही गमावून बसला. खिलाफतवाद्यांनी काँग्रेस आणि हिंदूंचे सहकार्य मिळविण्याचा देखावा केला. त्यामागे केवळ अखिल-इस्लामवादी उद्दिष्टे पूर्ण करण्याचा स्वार्थी हेतू होता. नोव्हेंबर १९२० मध्ये मौलाना अब्दुल बारींनी स्पष्टच लिहिले, त्यांच्याशी (गांधींशी) संलग्न होण्यातच इस्लामचे बळ आहे (रिलिजन अ‍ॅण्ड पॉलिटिक्स : दि उलेमा अ‍ॅण्ड खिलाफत मूव्हमेंट, मुशिरुल हसन, इकॉनॉमिक अ‍ॅण्ड पॉलिटिकल वीकली, खंड १६, क्र. २०, १९८१, पृ.९०७). दि. २७ डिसेंबर १९२३ ला काकीनाडा येथे भरलेल्या खिलाफत कॉन्फरन्समध्ये शौकत अली म्हणाले, “स्वराज्यप्राप्ती हे केवळ राजकीय आणि राष्ट्रीय कर्तव्य नसून, प्रमुख इस्लामी कर्तव्य आहे (कुरेशी, उपरोक्त, पृ.२७०).” थोडक्यात सांगायचे, तर हिंदूंनी ‘हिंदुस्थानी’ होण्यासाठी आपले हिंदुत्व सोडले. पण, मुस्लीम प्रथम आणि अखेरपर्यंत मुस्लीमच राहिले!
 
 
खिलाफत चळवळीने पाकिस्तानच्या निर्मितीसाठी अनुकूल पार्श्वभूमी तयार केली हे तिचे सर्वांत मोठे योगदान म्हणता येईल. इस्लामवर भर देऊन चळवळीने मुस्लिमांना त्यांच्या मुस्लीम असल्याची जाणीव करून दिली. ही भावना जुनी असली तरी आता त्यांना कधी नव्हे त्या तीव्रतेने आपण आधी मुस्लीम, मग हिंदुस्थानी असल्याचे वाटू लागले. हा मुस्लीम राष्ट्रवादासाठी विजय होता. कारण, त्याने अन्य ऐक्यभावना साकार करण्यास आधार दिला (द मेकिंग ऑफ पाकिस्तान : अ स्टडी (पान ६ वर) खिलाफत चळवळ : काय शिकावे, काय स्मरावे? इन नॅशनॅलिजम, के.के. अजीज, चट्टो आणि विंडस, लंडन, १९६७, पृ. ११५). १०० वर्षांपूर्वी घडलेली ऐतिहासिक घटना इतकेच खिलाफत चळवळीचे महत्त्व आहे का? त्या इतिहासापासून आज हिंदू काय बोध घेणार हा खरा प्रश्न आहे.
 
धडा क्र. १ : आधी इस्लाम, मग देश
 
 
एकूण मुस्लीम राजकारणाचा आणि विशेषतः खिलाफत चळवळीचा धांडोळा घेतल्यास मुस्लीम मानसिकतेचे काही पैलू स्पष्ट होतात. खिलाफत चळवळीच्या अनुषंगाने डॉ. अ‍ॅनी बेझंट यांनी मुस्लीम राजकारणावर पुढील भाष्य केले आहे, व्यावहारिक राजकारणात मार्गदर्शक म्हणून तलवारीचा जुना मुस्लीम धर्म आम्ही पुनरुज्जीवित झालेला पाहिला आहे; जजिरात-उल-अरब (अरबस्तानचा द्वीपकल्प) म्हणजे मुस्लिमेतराने आपले अपवित्र पाऊल जिथे टाकू नये, अशी पवित्र भूमी असल्याचा दावा सांगणारे जुने व्यावर्तकत्व (एक्सक्ल्युझिव्हनेस) शतकव्यापी आत्मविस्मृतीतून ओढून काढलेले आम्ही पाहिले आहे; अफगाणांनी हिंदुस्थानवर स्वारी केल्यास मुस्लीम त्यांच्या सहधर्मीयांना सामील होतील आणि शत्रूपासून मातृभूमीची रक्षा करणार्‍या हिंदूंना ठार मारतील, असे मुस्लीम नेत्यांनी म्हटल्याचे आम्ही ऐकले आहे; मुसलमानांची प्रथम निष्ठा आमच्या मातृभूमीप्रति नव्हे, तर इस्लामी देशांप्रति असल्याचे आम्हाला पाहावे लागले आहे. ते निवास करतात त्या राज्याच्या कायद्यांपेक्षा त्यांच्या विशिष्ट पैगंबराच्या कायद्यांचे पालन त्यांना करावे लागेल, हे मुसलमान नेत्यांचे म्हणणे राज्याच्या नागरी सुव्यवस्था आणि स्थैर्यास विघातक आहे. त्यांच्या निष्ठेचे केंद्र राष्ट्रबाह्य असल्यामुळे हे त्यांना वाईट नागरिक बनविते आणि मौलाना मुहम्मद अली आणि शौकत अलींसारख्या त्यांच्या प्रमुख नेत्यांचे विचार (मुस्लीम) एकीकडे उराशी बाळगून असताना त्यांचे सह-नागरिक त्यांच्यावर (मुस्लिमांवर) विश्वास ठेवू शकत नाहीत. हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यास लोकसंख्येचा मुस्लीम अंश - कारण अज्ञानी जनता पैगंबराच्या नावे त्यांना आवाहन करणार्‍यांचे अनुपालन करेल, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यास तातडीचे संकट ठरेल (द फ्युचर ऑफ इंडियन पॉलिटिक्स, अ‍ॅनी बेझंट, थियॉसॉफिकल पब्लिशिंग हाऊस, अड्यार, १९२२, पृ. ३०१-३०३).
 
अखिल-इस्लामवादाची चर्चा करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिहितात, इस्लाम प्रादेशिक निष्ठा मानत नाही. त्याच्या निष्ठा सामाजिक व मजहबी आणि म्हणून देशबाह्य आहेत... हा अखिल-इस्लामवादाचा आधार आहे. याच्यामुळेच भारतातील प्रत्येक मुसलमान, आपण मुस्लीम पहिले, नंतर भारतीय असे म्हणतो. भारतीय मुस्लीम भारताच्या प्रगतीत इतका अल्प सहभाग घेतो. पण, मुस्लीम देशांच्या हिताचा पाठपुरावा करण्यात तो श्रांत होतो आणि त्याच्या विचारात मुस्लीम देश प्रथम आणि भारत दुसर्‍या जागी असतो, याचे स्पष्टीकरण या भावनेत सापडते (पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया, बी. आर. आंबेडकर, ठाकर अ‍ॅण्ड कंपनी लि. १९४५, पृ. २९०,२९१).
 
धडा क्र. २ : धोरणात्मक युती म्हणजे एकी नव्हे
 
अखिल-इस्लामवादाची स्वाभाविक निष्पत्ती म्हणजे एखाद्या देशात राहणारे मुस्लीम आपल्या मुस्लिमेतर देशबांधवांशी एक होऊन परदेशस्थ मुस्लिमांचा विरोध कधीही करू शकत नाहीत! सन १९२४ मध्ये एका बंगाली पत्राच्या संपादकाने रवींद्रनाथ टागोरांची मुलाखत घेतली. तिचा वृत्तान्त १८ एप्रिल, १९२४ च्या ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने पुढीलप्रमाणे दिला, कविवर्यांच्या मते हिंदू-मुस्लीम एकी प्रत्यक्षात आणण्यास जवळजवळ अशक्य करणारे आणखी अतिशय महत्त्वाचे कारण म्हणजे मुस्लीम कुठल्याही एका देशापुरती त्यांची देशभक्ती मर्यादित ठेवू शकत नाहीत. एखाद्या मुस्लीम सत्तेने हिंदुस्थानवर आक्रमण केल्यास आपल्या सामायिक भूमीचे रक्षण करण्यासाठी मुस्लीम त्यांच्या हिंदू शेजार्‍यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहतील काय, असे मी अनेक मुस्लिमांना अत्यंत स्पष्टपणे विचारल्याचे कविवर्य म्हणाले. त्यांच्याकडून मिळालेल्या उत्तरांनी त्यांचे समाधान होऊ शकले नव्हते. एखाद्या मुस्लिमाला, मग तो कोणत्याही देशाचा असो, कोणत्याही परिस्थितीत दुसर्‍या मुस्लिमाविरुद्ध उभे ठाकण्याची अनुज्ञा नसल्याचे मुहम्मद अलींसारख्या लोकांनीदेखील म्हटल्याचे मी निश्चितपणे म्हणू शकतो, असे ते (कविवर्य) म्हणाले (डॉ. आंबेडकर, उपरोक्त, पृ. २६८,२६९).
 
हिंदू-मुस्लीम एकी झालेलीच आहे किंवा ती होण्याच्या नुसत्या इच्छेने ती होऊ शकते, अशा आविर्भावात गांधींसारखे काँग्रेस नेते वावरत होते. मुस्लीम समस्या अशी काही गोष्ट हिंदुस्थानात अस्तित्वात असल्याचे नेहरूंसारख्या नेत्याला मुळात मान्यच नव्हते. जातीयवाद हा केवळ दुष्प्रचार असून तो कोणतीही अडचण उत्पन्न करणार नाही. त्याला आवश्यकतेपेक्षा अधिक महत्त्व दिले जाते नि त्यावर नको इतका भर दिला जातो. त्याचा ‘जनतेवर मूलभूत परिणाम होत नाही’, ‘सामाजिक विषय’ जसे पुढे येतील तसा तो अनिवार्यपणे मागे पडेल, असे नेहरूंना वाटत होते (के.के. अजीज, उपरोक्त, पृ. १८७).
 
याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अभिप्राय पुढीलप्रमाणे, हिंदू-मुस्लीम एकी साध्य करण्यासाठी प्रामाणिक आणि अविरत प्रयत्न करण्यात आले आहेत आणि एका पक्षाने दुसर्‍यापुढे शरणागती पत्करण्यापलीकडे ती साध्य करण्यासाठी आता काहीही करण्यासारखे उरलेले नाही. हिंदू-मुस्लीम एकीच्या मागे लागणे मृगजळ असून तो विचार सोडून दिला पाहिजे, असे अकारण आशावाद बाळगण्याचा स्वभाव नसलेल्या एखाद्याने म्हटले, तर त्याला निराशावादी किंवा उतावीळ आदर्शवादी म्हणण्याचे धारिष्ट्य कोणीही करू शकणार नाही. आपल्या आधीच्या प्रयत्नांची शोकांतिका होऊनही हिंदू असे निष्फळ प्रयत्न करणार की, एकीचा प्रयत्न सोडून दुसर्‍या एखाद्या आधारावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार हे हिंदूंनी सांगावयाचे आहे (डॉ. आंबेडकर, उपरोक्त, पृ. ३०७).
 
खिलाफत चळवळीच्या एका टप्प्यावर हिंदू-मुस्लीम एकीचा जो आभास निर्माण झाला तो खिलाफतवाद्यांना त्यांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी असे करणे आवश्यक वाटले म्हणून! हिंदूंशी त्यांची मने कधीच जुळली नाहीत. मुस्लीम पक्षाच्या हेतूंविषयी गांधी सोडून बहुतेक हिंदू नेते साशंक होते हेही तितकेच खरे. मुस्लिमेतर लोकांशी एकी अथवा मैत्री करणे, हेच मुळी इस्लामला मान्य नसल्यामुळे तशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
 
धडा क्र. ३ : इस्लाममध्ये मजहब आणि राजकारण अभिन्न आहेत
 
खिलाफत चळवळ राजकीय होती की मजहबी (आजकालच्या भाषेत धार्मिक)? इस्लाममध्ये असे दोन वेगळे कप्पे अस्तित्वातच नसल्यामुळे हा प्रश्न अप्रस्तुत आहे. ऐहिक आणि पारलौकिक यांत इस्लाम भेद करत नाही. इस्लाममध्ये आंतरिकता नसल्यामुळे इस्लामी परलोकाची कल्पनादेखील ऐहिक सुखसोयींशीच निगडित आहे. इस्लामच्या दृष्टीने नागरी आणि राजकीय जीवनातील सर्व बाबी इस्लामी तत्त्वांवरच आधारित असल्या पाहिजेत. आधुनिक काळातील इस्लामचे अग्रगण्य भाष्यकार सैय्यद अबुल आला मौदुदी (१९०३-१९७९) यांचा पुढील अभिप्राय महत्त्वाचा, इस्लाम हा केवळ सिद्धान्त आणि रूढींचा संग्रह नव्हे. ती एक संपूर्ण जीवनपद्धती आहे. मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांसाठी मग ती खासगी वा सार्वजनिक, राजकीय वा आर्थिक, सामाजिक वा सांस्कृतिक, नैतिक वा विधिक आणि न्यायिक असोत, इस्लाम दैवी मार्गदर्शनाचे मूर्त रूप आहे. इस्लाम एक सर्वंकष विचार आहे... तो (इस्लाम) जीवनाकडे साकल्याने पाहतो आणि सर्वप्रकारच्या क्रियाकलापांसाठी मार्गदर्शन करतो... मजहब (रिलिजन) आणि राजकारणामध्ये कोणताही भेद इस्लामला मान्य नाही. इस्लामला मजहबी मार्गदर्शनानुसार राजकारणही चालवावयाचे आहे आणि राज्याचा वापर अल्लाहचा गुलाम म्हणून करावयाचा आहे. अल्लाह सार्वभौम राज्यकर्ता आणि विधिविवाचक असून त्याने प्रकटविलेला कायदा हाच देशाचा कायदा म्हणून अंगीकारण्यात यावा, असा ‘कुराणा’चा निर्देश आहे (दि इस्लामिक लॉ अ‍ॅण्ड कॉन्स्टिट्यूशन, अनु. खुर्शीद अहमद इस्लामिक पब्लिकेशन्स लिमिटेड, लाहोर, १९६०, पृ. १-५). प्रत्येकाने स्वतःचा धर्म घरात ठेवून सार्वजनिक जीवनात राज्यघटनेनुसार व्यवहार केल्यास हिंदुस्थानात सेक्युलर नंदनवन अवतरेल, अशी भाबडी अपेक्षा करणार्‍यांची कीव करावी तेवढी थोडी आहे. त्यांना इस्लामचा गाभाच समजलेला नाही!
 
 
धडा क्र. ४ : अखिल-इस्लामवाद कपोलकल्पित आहे
 
 
हिंदुस्थानातील खिलाफतवादी नेत्यांची मने तुर्की खिलाफतने व्यापलेली होती. मौज म्हणजे तुर्कांना स्वतःच्या खलिफाचे काहीच सोयरसुतक नव्हते. प्रेषित मुहम्मदांचा वंशज असलेल्या मक्केच्या शेरीफने इस्लामच्या या तथाकथित एकमुखी खलिफाविरुद्ध बंड पुकारले. ऑटोमन तुर्की साम्राज्याची अरब प्रजा स्वयंनिर्णयाची मागणी करत होती. अफगाणिस्तानच्या अमिराकडे डोळे लावून बसलेल्या खिलाफतवादी नेत्यांना आणि इस्लामी स्वर्गाच्या लालसेने तिथे जाणार्‍या मुस्लिमांची काय गत झाली? अफगाण जनतेने हिजरत करणार्‍या मुस्लिमांना पळता भुई थोडी केली. सन १९२४ मध्ये सौदी घराणे स्थापन करणार्‍या इब्न सौदने इस्लामच्या पवित्र स्थळांवर ताबा मिळवला. अरबस्तानातील अनेक ऐतिहासिक कबरींवर असलेले घुमट उद्ध्वस्त करण्याचे आदेश त्याने दिले. बहुसंख्य मुस्लिमांना या कबरींविषयी आस्था असल्यामुळे इब्न सौदने चालविलेल्या भंजनामुळे खिलाफतवाद्यांत दोन तट पडले.
 
अशा घटनांवरून अखिल-इस्लामवाद कपोलकल्पित असल्याचे खिलाफतवाद्यांना लक्षात यायला हवे होते. पण, अखिल-इस्लामवादाला मजहबी अधिष्ठान असल्यामुळे ही मंडळी सत्याकडे डोळेझाक करत राहिली. मजहबी सिद्धान्ताची भुरळ जोवर मुस्लीम मनावर कायम आहे तोवर भावी मुस्लीम पिढ्यादेखील कपोलकल्पिताच्या आहारी जाणार हे निश्चित!
 
 
धडा क्र.५ : मुस्लीम व्यवहार ठरावीक पद्धतीचा असतो
 
 
मुस्लीम व्यवहारावर इस्लामी विचाराचा पगडा असतो. हा विचार शाश्वत सत्य समजल्या जाणार्‍या पवित्र ग्रंथातून निष्पन्न झाला आहे. पवित्र ग्रंथाची वैधता स्थळकाळनिरपेक्ष असल्यामुळे मुस्लीम व्यवहार विविध स्थळी आणि काळी एकसारखा असतो. त्यामुळे इस्लामी विचार माहीत असल्यास मुस्लीम समाज अमूक परिस्थितीत कसा वागेल, याचा अचूक आराखडा बांधता येतो. पडती बाजू असताना मऊ वागायचे नि चढती बाजू असताना आधी अतिक्रमण व मग आक्रमण करायचे, हे मुस्लीम व्यवहाराचे वैशिष्ट्य असते. जिहादमधील विविध अत्याचार इस्लामी इतिहासाच्या सुरुवातीपासून तेच राहिले आहेत. त्यामुळे मुस्लीम व्यवहाराचा अंदाज घेऊन मुस्लिमेतर समाज त्यास आळा घालू शकतो किंवा योग्य तो उपाय करू शकतो. पण, हे करण्यासाठी इस्लामचा चष्मा घालून इस्लामी विचार समजून घेतला पाहिजे; अन्यथा घडणार्‍या घटनांचा तुटकपणे विचार केला जाईल. त्याच त्या घटनांची पुनरावृत्ती होऊनही मुस्लिमेतर समाज कधी शहाणा होणार नाही.
 
खिलाफत चळवळ चालू असताना किती हिंदू नेत्यांनी इस्लामी विचार जाणून घेण्याचा प्रयत्न केला? किती जणांनी आपल्या अनुयायांचे त्या दृष्टीने प्रबोधन केले? खिलाफत चळवळीला १०० वर्षे उलटली तरी मुस्लीम मानसिकता बदललेली नाही. खिलाफत चळवळ समजून घेत असताना हिंदूंनी इस्लाम जाणून घेण्याचे थोडे कष्ट घेतल्यास इस्लामला बळी पडलेले हजारो हिंदू व्यर्थ मेले नाहीत, असे म्हणता येईल.
 
- श्रीरंग गोडबोले
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@