भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी राज्य सरकारला विचारला जाब
नवी दिल्ली : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅनुअल मॅक्रॉन यांचा निषेध करण्यासाठी भेंडी बाजार येथे झालेल्या घृणास्पद प्रकाराबद्दल आता राज्य सरकारला प्रश्न विचारले जात आहेत. पैगं बर मोहम्मद यांचे वादग्रस्त व्यंगचित्र काढल्यानंतर कट्टरतावाद्यांकडून शिक्षणाचे मुंडके छाटण्यात आले होते. याविरोधात मॅक्रॉन यांनी उभे राहत कट्टरतावाला समूळ उखडून टाकण्याची मोहिम उघडली आहे. मात्र, मुंबईच्या भेंडी बाजारात रस्त्यावर मॅक्रॉन यांच्या विरोधाचे शंभरहून अधिक पोस्टर रस्त्यावर चिकटवण्यात आले आहेत. या घटनेचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. त्यामुळे मुंबईत काय सुरू आहे, असा प्रश्न भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.
विशेष म्हणजे यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मॅक्रॉन यांना पाठींबा दिला आहे. कट्टरतावादाविरोधात आपण एकत्र लढू अशी प्रतिक्रीयाही फ्रान्सने यावेळी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फ्रान्स सोबत आम्ही दहशतवादाविरोधात एकत्र उभे राहू, असे मोदी म्हणाले. आपल्या ट्विटमध्ये मोदी म्हणतात. “अलीकडे फ्रान्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तसेच चर्चमध्ये झालेल्या हल्ल्याचाही आम्ही निषेध करतो. फ्रान्समधील जनता आणि पीडित कुटूंबीयांसह आमच्या सद्भावना आहेत.”, असेही मोदी म्हणाले होते.
भारताने अशाप्रकारे भूमिका घेतल्यानंतर मुंबईत विशेषतः अशी घटना निंदनीय आहे, अशी प्रतिक्रीया भाजप प्रवक्ते संबित पत्रा यांनी दिली आहे. महाराष्ट्र सरकारच्या राजवटीत हे काय होत आहे. फ्रान्ससोबत आपला देश उभा आहे. जो जिहाद फ्रान्समध्ये झाला आहे. त्या दहशतवादाविरोधात भारताच्या पंतप्रधानांनी लढण्याची प्रतिज्ञा केली तर मग आता फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा अवमान का होत आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.
भोपाळमध्येही असेच प्रदर्शन
याच प्रमाणे पोस्टर चिकटवण्याचे प्रदर्शन भोपाळच्या रस्त्यांवरही पाहायला मिळाले. इथल्या इकबाल मैदानावर हजारो लोक सोशल डिस्टंसिंगचे नियम मोडून एकज्ञ आले. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात नारेबाजी करत एकत्र आले. त्यानंतर स्थानिक आमदार आरिफ मसूद आणि त्यांच्या दोन हजार समर्थकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.