मराठी तरुणांच्या स्वप्नांवर पालिकेचा बुलडोझर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Oct-2020
Total Views |
Dadar_1  H x W:
 
 

नवरात्रीत सुरू केला व्यवसाय : दादरच्या मराठी तरुणाची व्यथा

मुंबई : सरकारने मराठी तरुणांना एकदाच्या गोळ्या घालाव्यात, अशी अखेरची साद तरुणांकडून घातली जात आहे. ४० हजार रुपये खर्चून उभा केलेला व्यवसायाचा मुंबई महापालिकेने कायदेशीर कारवाईच्या नावाखाली चुराडा केला, असा आरोप तरुणाने केला आहे. बेकायदेशीररित्या पदपथावर हातगाडी उभी केली त्याचा वचपा पालिकेने काढल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुंबईकर आणि मराठी तरुणांसाठी आवाज उठवणारे पालिकेतील सत्ताधारी पक्ष याची जबाबदारी घेणार का, असा जाब विचारला जात आहे.
 
 
 
नेमके प्रकरण काय ?
 
दादर येथे राहणारे सिद्धेश भास्कर कामतेकर यांनी उद्योगधंद्यात पाऊल ठेवण्याचे स्वप्न पाहिले. घटस्थापनेच्या शुभमुर्हूर्तावर ‘श्री मिसळ’ या नावाने व्यवसायही सुरू केला. मात्र, दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीच याच व्यवसायावर पालिकेने बुलडोझर फिरवला. लॉकडाऊनमध्ये आधीच आर्थिक अडचणींनी पिचलेल्या कामतेकर यांच्यासमोर पालिकेने केलेल्या कारवाईमुळे आता पुढे करायचे काय, असा प्रश्न उभा राहिला आहे.
 
 
व्यवसायात उतरण्याचे धाडस
 
लॉकडाऊनमुळे उत्पन्नाचे स्त्रोत बंद झाले असल्याने ‘पुनःश्च हरि ओम’ म्हणत कामतेकर यांनी जोमाने व्यवसाय उभा केला. पोटाला चिमटा काढून साठवलेल्या पैशाने अत्यंत सुंदर अशी खाऊगल्लीत शोभून दिसेल, अशी रचना असलेली गाडी तयार केली. कोरोनामुळे सोशल डिस्टंसिंगचे पालन करत ग्राहकांची काळजी घेत व्यवहार सुरू केले. झणझणीत मिसळ ग्राहकांच्या जीभेवरही घोळू लागली. १५ दिवसांत ग्राहक जमू लागल होते. मात्र, मध्येच माशी शिंकली. याबद्दलची सविस्तर घटना ‘दादर मुंबईकर’ या फेसबूक पेजवर मांडण्यात आली आहे.


 
 
@@AUTHORINFO_V1@@