फ्रान्स हिंसाचार आणि धर्मांध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Oct-2020   
Total Views |

france_1  H x W
 
 
 
मुसलमानांना रागावण्याचा अधिकार आहे. तसेच इतिहासात फ्रान्सने खूप नरसंहार केला आहे. त्यामुळे फ्रान्समधील लाखो नागरिकांना मारण्याचा अधिकार मुसलमानांना आहे,” या शब्दांत मलेशियाचे माजी पंतप्रधान महातीर बिन मोहम्मद यांनी फ्रान्समधील दहशतवादी हल्ल्याचे समर्थन केले आहे. मोहम्मद पैंगबरांच्या विवादास्पद व्यंगचित्रामुळे फ्रान्समध्ये सध्या हिंसेचे सत्र सुरू आहे. एका शिक्षकाने ते व्यंगचित्र विद्यार्थ्यांना दाखवले म्हणून तिचा क्रूर खून झाला. त्याचा निषेध म्हणून फ्रान्सवासी रस्त्यावर उतरले, तर पुन्हा नीस येथे चर्चमध्ये एका माथेफिरूने निरपराध निष्पापांचा खून केला. या अशा खून सत्राला मलेशियाच्या या माजी पंतप्रधानाने समर्थन दिले. बहुतेक सर्वच इस्लामी देशांमधील अतिकट्टरपंथीय लोकांनी अशाच प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. बाहेरचे कशाला, मुंबईतील भेंडीबाजार आणि ठाण्यातील मुंब्र्यामध्येही फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे चित्र पायदळी तुडवले. असो. त्यामानाने हा निषेध मानवतावादी होता असेच म्हणायचे.
 
 
 
महातीर बिन मोहम्मद यांची बौद्धिक दिवाळखोरी आणि धर्मांधतेच्या नावावर अधर्म भारताला नवीन नाही. भारतात ‘सीएए’ कायदा लागू होत असताना, महातीरांना म्हणे खूप राग आला होता. त्यांना कुणी विचारले नसतानाही त्यांनी कडाडून विरोध केला होता. नेहमीप्रमाणे जगभरच्या मुस्लिमांना एक होण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला जगभरातल्या मुसलमान बांधवांनी किती गंभीरपणे घेतले माहिती नाही. मात्र, महातीर हे त्यांच्याच देशात आजी पंतप्रधानाचे माजी पंतप्रधान झाले. मलेशियाच्या या माजी पंतप्रधानांचे वक्तव्य सांगण्याचे कारण की, याच मलेशियामध्ये स्वघोषित मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईक याचे आजचे वक्तव्य. नाईक म्हणाला की, “अल्लाच्या बंद्यांना शिवीगाळ करणार्‍यांना दर्दनाक सजा मिळेल.” वर वर पाहता वाटते की, अल्लाचे नेक काम करणार्‍यांना जे विरोध करतात, त्यांना भयंकर सजा मिळेल, असे त्याला म्हणायचे आहे का? कदाचित त्याच्या वक्तव्याला बळी पडणार्‍यांना असे वाटेलही. मात्र, ढाक्यामध्ये घृणास्पद बॉम्बस्फोट करणार्‍या अतिरेक्यांनी कबुली दिली होती की, झाकीर नाईकचे भाषण ऐकून त्यांना बॉम्बस्फोट करण्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळे झाकीर नाईक फ्रान्समध्ये धर्मबिर्माच्या नावावर दहशत माजली असताना जेव्हा म्हणतो की, ‘अल्लाच्या बंद्याना शिवीगाळ करणार्‍यांना भयंकर सजा मिळेल,’ त्यावेळी त्या विधानाला अनेक अनर्थ प्राप्त होतात.
 
 
 
जगभरात धर्माच्या नावाने पाशवी उन्माद माजवणारे जगाचे काही शत्रू आहेत. हे शत्रू धर्माचे मानवी रूप, त्यातील मानवी शाश्वत मूल्ये समाजासमोर मांडण्याऐवजी धर्माच्या नावावर क्रूरता, हिंसा पसरवतात. झाकीर नाईकवर भारतात नेमका हाच गुन्हा दाखल आहे. मलेशियामध्ये लपून बसून झाकीर पुढे असेही म्हणाला की, “जगातील सर्व मुस्लीम देशांनी भारतातील मुस्लीमविरोधी बोलणार्‍या लोकांची यादी तयार करावी, त्यांना आपल्या देशात प्रवेश देऊ नये. प्रवेश दिलाच तर त्यांना तत्काळ अटक करावी.” हे असे लोक कोण सांगताना झाकीर नाईक याने भारतातील भाजप पक्षाचे नेते असेही सांगितले आहे. चालायचेच, झाकीर नाईकचे वडील अब्दुल करीम नाईक हे राष्ट्रवादीचे नेता शरद पवार आणि बॅ. अंतुले यांच्याशी चांगलेच परिचित होते. झाकीरच्या वडिलांनी नेतेमंडळींशी उठबस वाढवून मुस्लीम शाळा काढली आणि तिथूनच झाकीर नाईकचा प्रवास सुरू झाला, असे गुगलबाबा सांगतो. असो तो भूतकाळ झाला.
 
 
 
पण, जगभरात मात्र एक अस्वस्थता पसरली आहे. धर्माचे नाव घेऊन लोक अधर्म का माजवतात? मुस्लीम धर्माचे गाढे अभ्यासक असलेले सज्जन लोक कुराण आणि आयातीचा संदर्भ देतात की, ज्याच्यापासून लोकांना आपल्या जीवाची आणि संपत्तीची सुरक्षा वाटेल तो मुसलमान आहे. मुसलमान तो आहे, ज्याच्या वक्तव्य आणि आचरणातूनही इतर सुरक्षित असतील, असे लिहिले आहे. इतकेच नाही तर इस्लामध्ये कुणाचाही विनाकारण खून करणार्‍यांचाही निषेध केला आहे. तसेच जगात हिंसात्मक वातावरण तयार करणार्‍यांचाही निषेध केला आहे. जर असे असेल तर मग फ्रान्समध्ये चाललेल्या हिंसेचे समर्थन करणारे मुसलमान आहेत का? असतील तर मग कुराणाच्या अमन आणि सुकूनच्या पैगामांचे काय?
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@