शिल्पकलेतील ‘भगवान’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Oct-2020
Total Views |

Bhagwan Rampure_1 &n
 
 
शिल्पकार भगवान रामपुरेंशी माझे समक्ष बोलणे व त्यांच्या स्टुडिओत जाऊन त्यांचं काम पाहण्याचा योग आला नाही. मात्र, ‘भगवान’ सर्वांना दिसतो, त्याप्रमाणे मलाही हा ‘भगवान’ दिसत होताच.
 
 
अभिजात कलावंतांच्या कलेचं महत्त्व पटायला अन् स्वीकारायला फारसा वेळ लागत नाही. ओशोंनी कलावंतांमध्ये गायक, वादक, नर्तक चित्रकार आणि शिल्पकार या पाच कलाप्रकारांना अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे. त्यातही चित्रकाराला सर्वाधिक! शिल्पकाराला शिल्पाकृती बनविण्याच्या अगोदर त्याने अगोदरच मनात चिंतन केलेले असते. बव्हंशी जण तर अगोदर असंख्य शीघ्ररेखांकने करतात, नंतर ‘आर्मीचर’ बनवायला घेतात. ‘आर्मीचर’ म्हणजे समोरच्या व्यक्तीने जशा लकबीने शरीराला रचना दिलेली आहे, त्यानुसार त्या पोझमधील त्या व्यक्तीच्या शरीरातील हाडांची रचना कशी असू शकते, याचा बारकाईने विचार करून तशाच प्रकारची रचना तारांच्या मदतीने करायची स्केचिंग करताना समोरची व्यक्ती ज्याप्रमाणे बसलेली असते, तिच्या त्या बसण्याची ढब केवळ एका रेषेने कमीत कमी ‘रेंडरिंग’ करून जसा एक ढोबळ आराखडा बनविला जातो. इकडे तिच भूमिका हे ‘आर्मीचर’ बजावत असते.
 
 
भगवान ओशो म्हणतात, “मेडिटेट होण्यासाठी चित्रकार व्हावं लागतं!” चित्रकार हा कमीत कमी वेळेत मेडिटेट होतो, तेव्हा तो हुबेहूब व्यक्तिचित्रण साकारतो, दुसरं स्थान शिल्पकाराचं! प्रत्येक शिल्पकार हा चित्रकार असतोच असतो. मात्र, प्रत्येक चित्रकार हा शिल्पकारचं असतो, असं नसतं. चित्रकलेतील भगवान जेव्हा हाताची बोटे आणि क्लेला वळणं देण्यासाठी हत्यारांचा-साहित्याचा उपयोग करतो, तेव्हा त्या व्दिमीत चित्रांकनाला त्रिमित स्वरूप प्राप्त होते आणि काही वेळाने तो त्रिमितकार मूर्तिमंत जीवंतपणा घेऊन प्रथम त्या भगवानशी बोलू लागतो आणि चेहर्‍यावरील डोळ्यांमध्ये जेव्हा हा भगवान एकात्मतेची संजीवनी टाकतो, तेव्हा ते त्रिमितकार मग एक सुंदर जीवंत व्यक्तीमध्ये रूपांतरित होतो. ज्याच्या नावातच ‘भगवान’ आहे, त्याची कलाकृती मृत कशी असेल, अशा एका भगवानच्या हातांच्या बोटांची जादू आपण या लेखात जाणून घेत आहोत. हा ‘भगवान’ शिल्पकलेतील स्वतंत्र अढळ स्थान निर्माण केलेला आहे. भगवान रामपुरे!
 
 
सोलापूर हे एक भारतातलं असं शहर आहे की, या शहरात गल्ल्या गल्ल्यांमधून कर्नाटक-आंध्र- तामिळनाडू अशा प्रांतांचं दर्शन होतं. येथीलच हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे यांनी एकदा सोलापूर शहर वस्तीचं फार सुंदर वर्णन केलं होतं. त्यात वरील उल्लेख आलेला होता. सुदर्शन देवडकौंडा हे ज्येष्ठ वास्तववादी व्यक्ती चित्रकार आणि कॅलेंडर आर्टिस्ट पोरे ब्रदर्स अशा साधकांनी सोलापूरचं नावं कलाक्षेत्रासाठी जोडलेलं आहे. त्याच सोलापूरचे भगवान हे १९८७ साली शिल्पकार भगवान रामपुरे झाले! सोलापूरलाच नव्हे, तर महाराष्ट्राच्या कला संस्कृतीला आध्यात्मिक बैठक असलेला आणि व्यवसायापेक्षा आत्मानंदाशी प्रामाणिक असणारा शिल्पकार लाभला.
 
 
शिल्पकार भगवान रामपुरेंशी माझे समक्ष बोलणे व त्यांच्या स्टुडिओत जाऊन त्यांचं काम पाहण्याचा योग आला नाही. मात्र, ‘भगवान’ सर्वांना दिसतो, त्याप्रमाणे मलाही हा ‘भगवान’ दिसत होताच. त्यांच्या पवित्र भाव असलेल्या त्रिमित कलाकृतींद्वारे त्यांचं प्रत्येक काम हे मूर्तिमंत जीवंत आणि स्मृतिप्रवण ठरतं. याचं कारण ते त्यांच्या कलाकृतीला बनवत नाहीत, त्यांच्या मेडिटेशनमधून कलाकृतीच बनत असते. ते फक्त कारण असतात. मग गुलजारजींच्या ‘बोस्कियाना’ पाली हिल येथील घराच्या बागेतील गुडघ्यावर हात ठेवलेला एक हात जमिनीवर विसावलेला आणि अर्धोन्मिलित डोळे असलेला ध्यानस्थ बोधी असो की, जन्मदेत्या तीर्थरुप आम्माचे आईचे पोर्ट्रेट अन् त्यातून मूर्तीशिल्प असो.... सारं सार अद्भुत थक्क करणारं. शेरोशायर कविवर्य गुलजारजींनादेखील शिल्पबद्ध करण्यात भगवानजींनी हस्त कौशल्याचा उत्सव साजरा केला आहे. ऐश्वर्यांचं (म्हणजे सांपत्तिक दृष्टीने श्रीमंत... या अर्थाने) प्रतीक असलेल्या वृषभाचं अर्थात कमी वयातील बैलाचं - आम्ही त्याला ‘खोंडू’ किंवा ‘गोर्‍हा’ म्हणतो. त्याचं मूर्तिमंत रुप आपल्याला मुंबईच्या दलाल स्ट्रीटवर पाहायला मिळेल. मला त्यांचं निद्रिस्त बुद्धाचं एक धातूतील मूर्तिकाम फार भावलं. त्यांनी त्या निद्रिस्त बुद्धाच्या विशिष्ट आणि वैशिष्ट्यपूर्ण आकारांना शोधून बुद्धाचं पूर्णत्व दाखविण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. कोपरावर संपूर्ण शिल्पाकृतीचा तोल सांभाळून ‘निगेटिव्ह’ स्पेसचा इतका अद्भुतपणे उपयोग शिल्पकार रामपुरेंनी साधलेला आहे की, पाहणारा रसिक जर जीवंत मनाचा असेल, तर तो तादात्म्य पावेल अन् तासन्तास त्या मूर्तीकडे पाहत एकरुप होईल, त्याचं जीवनचक्राच्या पलीकडे नावाचं धातुशिल्प अमूर्त श्रीगणेश, गौरी कर्णिक, भगवान ओशो, ध्यान, अगदी श्री स्वामी समर्थ आदी देवतांच्या मूर्तीपर्यंत अनेक कलाकृती त्यांनी चिरंजीव केलेल्या आहेत.
 
 
सोलापूरला १९८१ ला दहावीचं शिक्षण कसंबसं पूर्ण केलं. तेथेच एक वर्षाचा फाऊंडेशनचा अभ्यासक्रम पूर्ण केला. प्रसंगांमुळे अनेकांना वळण लागतं. मात्र, प्रसंगांना वळण लावणारा एखादाच असतो. त्या ‘एखाद्या’च्या यादीत शिल्पकार भगवान रामपुरेंचं नाव आवर्जून घेतलं जातं. संकटांना सुसंधी मानून आणि अडचणींवर मात करून मुंबईच्या (त्यावेळी लौकिक प्राप्त) सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिल्पकलेला प्रवेश घेतला. १९८७ ला शिल्पकलेतील पदवी संपादन केली आणि कलेला व्यवसायाचं वाहन करुन भगवान यांचा शिल्प व कलाप्रवास सुरु झाला तो आज दिनांकापर्यंत अव्याहतपणे सुरु आहे. त्यांच्या कलाकार्याला वसंत ऋतूतील बहर कायम लाभो, त्यांच्याकडून अनेक, मूर्तिमंत कलाकृती निर्माण होवो, याच त्यांना शुभेच्छा...!!
 
- प्रा. गजानन शेपाळ 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@