आता कायदाच हवा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Oct-2020
Total Views |

Vallabhgarh_1  
 
 
‘कलम ३७०’ असो किंवा ‘तिहेरी तलाक’विरोधी कायदा, केंद्र सरकारने आपली अपेक्षापूर्ती केलेली आहे. आता ‘लव्ह जिहाद’ला पायबंद घालण्यासाठीही तशीच ठोस व परिणामकारक कायदेशीर तजवीज करायला हवी, तरच या घटना आटोक्यात येऊ शकतील.
 
 
‘लव्ह जिहाद’ नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही, म्हणणाऱ्यां च्या नाकाखालीच तौफिक नामक धर्मांध मुस्लिमाने निकिता तोमर या हिंदू मुलीचा जीव घेतला. हरियाणातल्या वल्लभगडमध्ये महाविद्यालयीन वर्गाच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या निकिता तोमरवर तौफिकने दिवसाढवळ्या गोळ्या झाडल्या. ‘मुस्लीम धर्म स्वीकार, आपण दोघे निकाह करु,’ असे कट्टर जिहादी तौफिकचे म्हणणे होते. इतकेच नव्हे तर ‘मासूम’ सांगितल्या जाणाऱ्या इस्लामी खातुनांपैकी एक म्हणजे तौफिकच्या अम्मीजाननेही निकितावर अनेकदा धर्मांतरासाठी दबाव आणला होता. मात्र, ‘हिंदू म्हणून जन्माला आले, हिंदू म्हणूनच मरणार’च्या प्रबळ इच्छाशक्तीपोटी निकिताने धर्मांतर केले नाही आणि रागाने, सुडाने पेटून उठलेल्या धर्मांध जिहादी तौफिकने तिची हत्या केली. हिंदू धर्मासाठी आणखी एका कन्येने हौतात्म्य पत्करले, मोहम्मद बिन कासिमपासून अल्लाउद्दीन खिलजी, बाबर, हुमायुं, जहाँगीर, शाहजहान, औरंगजेब, फाळणीवेळचे हल्लेखोर, काश्मिरी हिंदूंना पळवून लावणारे दहशतवादी आणि आताच्या तौफिकपर्यंत कट्टर इस्लामानुयायांनी सुरु केलेल्या जिहादला आणखी एक हिंदू मुलगी बळी पडली. पण, सगळीकडे चिडीचूप शांतता, कोणीही काहीही बोलायचे नाही, कोणीही कसलाही आरडाओरडा करायचा नाही, कोणीही न्यायाची मागणी करायची नाही! का? कारण, मरणारी मुलगी हिंदू होती, मारणारा मुलगा मुस्लीम होता आणि मुस्लीम तर ‘डरी हुई कौम’ आहे ना, मग ते कसे कोणाला मारतील? ते कसे कोणावर हल्ला करतील? ते कसे कोणावर गोळ्या झाडतील? हो, उलट बंगळुरुतील दंगलीतल्याप्रमाणे मुस्लिमांनी ‘ह्युमन चेन’ तयार करुन निकिताला वाचवण्याचा प्रयत्न नक्कीच केला असेल! त्यामुळे त्यांच्यावर आरोप करु नका, त्यांना दोष देऊ नका, त्यांना गुन्हेगार ठरवू नका! चूक तर हिंदूंचीच असेल, हिंदूंनी राजीखुशीने निकिताचे धर्मांतर करुन दिले असते, निकिताचा इस्लामी काझी-मुल्ला-मौलवीसमोर ‘कुबूल हैं’, ‘कुबूल है’, ‘कुबूल हैं’ म्हणत निकाह लावून दिला असता, निकिताला बुरखारुपी पोत्यात बंद केले असते, तर तौफिकने कशाला बंदुक हाती घेतली असती? हो ना? अगदी अशीच मानसिकता, अशीच भावना आज कथित पुरोगामी, बुद्धिजीवी, धर्मनिरपेक्ष आणि उदारमतवादी टोळक्याच्या मनात असेल नाही? म्हणूनच तर तोंडात शिरखुर्म्याचा भुरका मारुन ही मंडळी गप्प बसलीयत!
 
 
मात्र, हिंदू धर्मीयांनी शांत बसून चालणार नाही. तौफिक निकिताला २०१८ सालापासून सतावत होता, एकतर्फी प्रेमापायी त्याने एकदा तिचे अपहरणही केले होते. पण, तौफिकच्या मागे काँग्रेसी आमदार, मंत्र्याची ताकद होती. तौफिकचे आजोबा खुर्शीद अहमद राज्यात कॅबिनेट मंत्रिपदी होते, त्यांचा एक मुलगा आजही आमदार आहे. त्यांनी सर्वांनीच निकिताच्या कुटुंबावर आणि पंचायतीवर दबाव आणला व अपहरणाचे प्रकरण दडपून टाकले. इथूनच तौफिकची हिंमत वाढत गेली आणि अखेरीस धर्मांतराला, निकाहाला नकार दिल्याने त्याने निकिताचा जीव घेतला. पण, असे किती दिवस चालणार? इथे फ्रान्सचे उदाहरण समजून घेतले पाहिजे. फ्रान्समध्ये एका शिक्षकाची मोहम्मद पैगंबराचे व्यंगचित्र दाखवले म्हणून धर्मांध मुस्लिमाने मुंडके उडवत हत्या केली. तथापि, इतकी वर्षे धर्मनिरपेक्षता आणि उदारमतवादाच्या मूल्यांसाठी ज्यांना सांभाळले, त्यांनीच उलटून हल्ला केला, तर फ्रेंच जनताही रस्त्यावर उतरली. विशेष म्हणजे, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी शिक्षकावरील हल्ल्याला ‘इस्लामी दहशतवादी हल्ला’ म्हटले, तसेच इस्लाम जगावरील संकट असल्याचे थेट शब्दांत सांगितले. फ्रान्समधील जनतेचा कट्टरतेविरोधातील संताप अजूनही जसाच्या तसा आहे. मात्र, भारतातली परिस्थिती नेमकी उलट आहे. इथे ‘लव्ह जिहाद’वर कोणी चर्चाही करत नाही. पण, निकिताची घटना एकमेव नाही, तर याआधी अशा कित्येक घटना घडल्यात. धर्मांध जिहादींची वृत्ती अशी की, ‘हिंदू मुलगी माझी झाली तरी मारुन टाकणार आणि नाही झाली तरी मारुन टाकणारच’ आणि याची अनेकानेक उदाहरणे सांगता येतील. निकाह केला तरी उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये यंदाच्याच जुलैमध्ये जिहादी शमशादने पत्नी आणि मुलीची हत्या केली होती, तर आता निकिताचा निकाह केला नाही, म्हणून खून केला. तरीही सगळीकडे शांतता, ‘लव्ह जिहाद’चा प्रकार अस्तित्वातच नाही, असेच ठसवले जाते. पण, हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे, कट्टर मुस्लिमांसाठी ‘लव्ह जिहाद’ ‘दार-उल-हर्ब’ला ‘दार-उल-इस्लाम’पर्यंत घेऊन जाण्याचे साधन आहे आणि जोपर्यंत हिंदू त्याचा जनजागृतीने, संघटनशक्तीने मुकाबला करत नाही, तोपर्यंत ही समस्या तशीच राहील.
 
 
हाथरस प्रकरणावरुन राजकीय गिधाडांनी धिंगाणा घातला. अर्थात, त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे. पण, तेव्हा न्यायाची भाषा करणारे बडी बिंदीवाले, मेणबत्तीवाले, प्रसारमाध्यमे, महिला संघटना, राजकीय पक्ष, राहुल-प्रियांका आता एका शब्दानेही बोलत नाहीत. चरसी बॉलीवूडला वाचवण्यासाठी संसदेत ‘जिस थाली में खाते हो’ची डायलॉगबाजी करणाऱ्या खासदारही आता चूप आहेत, महिला अधिकारांवरुन काहूर माजवणाऱ्या अभिनेत्रीचे स्वर थंड पडलेत, जेएनयुमध्ये जाऊन जिहादी-नक्षल्यांना ‘छपाक’कन पाठिंबा देणारी अभिनेत्री शांत आहे, भारतात भीती वाटत असल्याने देश सोडण्याची भाषा करणारी अभिनेत्याची पत्नी सुखात आहे, यापैकी कोणालाही निकिताच्या हत्येच्या वेदना झाल्या नाहीत. म्हणूनच आता हिंदूंनीच एकत्र आले पाहिजे आणि सरकारला ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा तयार करायला भाग पाडले पाहिजे. केरळ उच्च न्यायालयाने याआधीच ‘लव्ह जिहाद’चे अस्तित्व मान्य केलेले आहे, त्यामुळे न्यायालयीन आदेशानुसार कायदा करायला कसलीही हरकत नसावी. जनतेने मागणी केली, तर केंद्र सरकार किंवा ठिकठिकाणची राज्य सरकारे तशी पावले नक्कीच उचलू शकतील. २०१४ साली मोठ्या अपेक्षेने संपूर्ण भारतीयांनी आणि हिंदूंनी भाजपला मतदान केले, २०१९ सालीही पुन्हा मताधिक्क्याने सत्तेवर आणले. त्यामुळे आपल्या सरकारसमोर आपणच अपेक्षा ठेवली पाहिजे आणि ‘कलम ३७०’ असो किंवा ‘तिहेरी तलाक’विरोधी कायदा, केंद्र सरकारने आपली अपेक्षापूर्ती केलेली आहे. आता ‘लव्ह जिहाद’ला पायबंद घालण्यासाठीही तशीच ठोस व परिणामकारक कायदेशीर तजवीज करायला हवी, तरच या घटना आटोक्यात येऊ शकतील. कारण, हिंदू मुली धर्मांध मुस्लिमांच्या चाकू, तलवार किंवा गोळ्यांनी मरायला जन्म घेत नाहीत.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@