मुंबईवर दहशदवादी हल्ल्याचे सावट : 'ड्रोन'वर बंदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Oct-2020
Total Views |

Mumbai_1  H x W
 


मुंबई - दहशतवादी हल्ल्याचा कट : गुप्तचर यंत्रणांचा इशारा

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या मुंबई शहरावर दहशतवादी हल्ला करण्याचा कट शिजत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. गुप्तचर यंत्रणांनी महाराष्ट्र सरकारला दहशतवादी हल्ल्याची माहिती देत सतर्क केले आहे. या विभागाच्या पत्रानंतर मुंबईत अलर्ट जारी करण्यात आला आहे. संपूर्ण शहरात ड्रोन उडवण्यास मनाई करण्यात आली आहे. मुंबई पोलीसांनी संभाव्य इशारा म्हणून हा आदेश जाहीर केला आहे.
 
 
 
आदेशात म्हटल्यानुसार, दहशतवादी आणि राष्ट्रद्रोही शक्तींकडून ड्रोन आणि रिमोर्टद्वारे चालवल्या जाणाऱ्या हलक्या एअरक्राफ्ट, एरिअल मिसाईल, पॅरा ग्लायडरद्वारे हल्ला केला जाऊ शकते. गर्दीची ठिकाणे आणि अतिमहत्वाच्या ठिकाणी हा हल्ला केला जाऊ शकतो. कायदा सुव्यवस्था बिघडवणे आणि सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणे हे दहशतवाद्यांचे मनसुबे आहेत.
 
 
एक महिन्यापर्यंत लागू राहणार आदेश
 
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईभर अलर्ट लागू करण्यात आला आहे. पत्रात म्हटल्यानुसार, या इशाऱ्याचे गांभीर्य लक्षात घेत कुठल्याही प्रकारच्या उडत्या वस्तूंना प्रतिबंध लावण्यात येत आहे. हा आदेश पुढील महिनाभर लागू राहणार आहे.



@@AUTHORINFO_V1@@