नागपूरात जाणवले भूकंपाचे धक्के

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Oct-2020
Total Views |
earthquake_1  H

 
 
 
नागपूर : नागपूरच्या उत्तर पूर्व भागात मंगळवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले होते. पहाटे चार वाजता सारेजण साखरझोपेत असताना हे धक्के जाणवले. मात्र, याबद्दलचे वृत्त समजल्यानंतर साऱ्यांमध्ये एकच घबराहट पसरली होती. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीच्या माहितीनुसार, नागपूरमध्ये पहाटे आलेल्या या भूकंपाची तीव्रता ३.३ व डेप्थ १५ किमी इतकी होती.
 
भूकंपाची वेळ पहाटे ४ वाजून १० मिनिटे आणि ५० सेकंद इतकी होती. नागपूरचा उत्तर पूर्व ९६ किमी दूर मध्य प्रदेशच्या नजीक सीवनी येथे नोंद करण्यात आला. यामुळे कुठलीही जीवित किंवा आर्थिक हानी झालेली नाही. एका वर्षांत नागपूरला भूकंपाचे धक्के जाणवण्याची ही दुसरी वेळ आहे.



@@AUTHORINFO_V1@@