पाकिस्तान हादरले ! पेशावरमधील मदरशात भीषण स्फोट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Oct-2020
Total Views |

pakistan_1  H x


पेशावर:
पाकिस्तानमधील पेशावर येथील डार कॉलनीत भीषण स्फोट झाला आहे. मदरशात झालेल्या या स्फोटात सातजण ठार झाले असून जवळपास ७० जखमी झाले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याचे समजते. आज सकाळच्या सुमारास हा स्फोट झाला. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. मृतांमध्ये आणि जखमींमध्ये ९ ते १५ वर्षाच्या मुलांचा समावेश असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे.



वरिष्ठ पोलीस अधीक्षक मन्सूर अमन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असल्याचे पाकिस्तानमधील 'द डॉन' या वृत्तपत्राने म्हटले आहे. हा स्फोट आयईडी स्फोट असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. या स्फोटासाठी जवळपास पाच किलो स्फोटकांचा वापर केला असल्याची शक्यता सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केली आहे. स्फोटाची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटना स्थळावरून पुरावे जमा करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.. स्फोटाच्या कारणांचा तपास सुरू आहे. या स्फोटामागचा नेमका उद्देश अद्यापपर्यंत समजलेला नाही. मदरशात मुलांचा अभ्यास सुरू असताना जोरदार स्फोट झाला,' अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.


एलआर रुग्णालयाचे प्रवक्ते मोहम्मद कासिम यांनी आतापर्यंत रुग्णालयात ७ जणांचे मृतदेह आणि ७० पेक्षा अधिक जखमींना आणण्यात आल्याची माहिती दिली. जखमींवर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले आहेत. रुग्णालयात आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. सगळ्या कर्मचाऱ्यांना तातडीनं रूजू होण्यास सांगण्यात आल्याची माहिती कासिम यांनी दिली.
@@AUTHORINFO_V1@@