कोरोनाचा कहर (भाग ३०) - प्रतिक्रिया आणि रोगप्रतिकारकशक्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Oct-2020
Total Views |

Homeopathic_1  
 
 
आपण रोगप्रतिकारकशक्तीचा अभ्यास करत असताना असे पाहिले की, रोगप्रतिकारकशक्ती ही आपल्या चैतन्यशक्तीवर आपल्या संवेदनशीलतेवर व आपल्या जीवनशैलीवर अवलंबून असते. संवेदनशीलता ही जीवंत प्राण्याची एक अंतर्निहीन शक्ती आहे. माणसाची किंवा इतर जीवंत प्राणी यांची संवेदनशीलता म्हणजे जन्मजात असलेली व कुठल्याही बाह्य किंवा अंतर्गत प्रेरणेला म्हणजेच स्टिम्युलसला (Stimulus) दिलेली उत्स्फूर्त प्रतिक्रिया होय. संवेदनशीलता व विशिष्ट प्रतिक्रिया हा रोगप्रतिकारकशक्तीचाच एक भाग आहे. जोपर्यंत संवेदनक्षमता व त्यानंतर येणारी विशिष्ट प्रतिक्रिया ही त्वरित असते, तोपर्यंत माणसाची किंवा प्राण्याची रोगप्रतिकारकशक्ती ही मजबूत व सजग असते.
 
 
ही रोगप्रतिकारकशक्ती माणसाच्या संरक्षण क्षमतेचा व कार्यकारणभावाचा प्रवाह आहे. याचमुळे प्राण्याच्या पेशींचे व ऊर्जेचे त्रासदायक घटकांपासून संरक्षण होत असते. रोगप्रतिकारकशक्तीचा हा प्रवाह मुख्यत्वे मेंदू व चेतासंस्थेशी संलग्न असा असतो व तो साधारणपणे नेहमी उच्चदाबाकडून कमी दाबाकडे प्रवाहित होत असतो, म्हणजेच शरीरातील ज्या ठिकाणी प्रतिकारशक्ती कमी पडत असेल, अशा ठिकाणी हा प्रवाह मुख्यत्वे प्रवाहित होत असतो. जोपर्यंत हा प्रवाह सुरळीत असतो तोपर्यंत कुठलाच त्रास नसतो. परंतु, जर या प्रवाहात कुठल्याही प्रकारचे अडथळे निर्माण झाले, तर हा प्रवाह खंडित होतो किंवा मंद होतो व त्यानुसार प्रत्येक शरीर एक विशिष्ट प्रकारची प्रतिक्रिया देत असते. त्यालाच किंवा रोगप्रतिकारकशक्ती चेतवण्यासाठीची प्रेरणा किंवा ‘स्टिम्युलस’ असे म्हटले जाते. ही एक प्रतिक्षिप्त क्रिया असते व ही माणसाच्या अनुकूलन क्रिया, तसेच पर्यावरणाच्या बदलांशी तसेच सभोवतालच्या वातावरणाशी जुळवून घेण्याच्या नैसर्गिक क्रियेमध्ये सामावलेली असते.
 
 
संवेदनशीलतेमुळेच ही प्रतिक्रिया पाहायला मिळते. रोगाची लक्षणे व चिन्हे जेव्हा दिसतात, तेव्हा ती ज्या विशिष्ट प्रतिक्रियेत येतात, त्याला आजाराचे विश्लेषण करत असताना फार महत्त्व असते. प्रत्येक माणसाची किंवा प्राण्याची प्रतिक्रिया ही एकाच घटनेसाठी किंवा क्रियेसाठी वेगवेगळी असू शकते. म्हणूनच जेव्हा प्रत्येक माणसाची प्रतिक्रिया देण्याची शक्ती ही वेगळी असते व त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाची प्रतिकार करण्याची शक्ती, इम्युनिटी ही वेगळी असते, यालाच होमियोपॅथीमध्ये आपण ‘वैयक्तिकीकरण’ किंवा ‘इंडिव्ह्युझलायेशन’ असे म्हणतो, या वैयक्तिकीकरणाला अनुसरुन शरीर कशी रोगप्रतिकारकशक्ती बनवते ते आपण आता पुढे पाहू.
 
 
- डॉ. मंदार पाटकर
 
 
(लेखक एम.डी. होमियोपॅथी आहेत.)
 
 
@@AUTHORINFO_V1@@