ठाण्यातून बिबट्याच्या कातडीची तस्करी उघड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Oct-2020
Total Views |

leopard _1  H x
ठाणे गुन्हे शाखेकडून दोन आरोपींना अटक 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - ठाणे गुन्हे शाखेने ठाण्यामधून बिबट्याच्या कातडीची तस्करी उघडकीस आणली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींच्या मुद्देमालासह मुसक्या आवळल्या आहेत. बिबट्याच्या कातडीची विक्री करण्याच्या उद्देशाने हे आरोपी पुण्याहून ठाण्यात आले होते. 
 
 
ठाण्यातून पुन्हा एकदा वन्यजीवांच्या अवयवांची अवैध तस्करी उघडकीस आली आहे. ठाण्यातील सिडको बस स्टाॅप जवळ दोन व्यक्ती बिबट्याची कातडी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी सायकांळी या परिसरात सापळा लावला. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बस स्टाॅपवर दोन इसम पोलिसांना आढळले. त्यामधील एका व्यक्तीजवळील प्लास्टिकच्या पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये बिबट्याचे कातडे सापडले. हे कातडे एका कापडी पिशवीत भरुन ठेवले होते. 
 
 
६३ इंच लांब आणि १७ इंच रुंद असलेले सुकवून कडक केलेले बिबट्याचे कातडे पोलिसांनी ताब्यात घेतले. या कातड्यातील चारही पाय शाबूत होते. मात्र, त्यावर नखे नव्हती. या प्रकरणी सचिन भगवान भोसले (वय ३३) आणि शहाजी दांडे (वय ३०) या दोन आरोपींना पकडण्यात आले. हे दोन्ही आरोपी पुण्यातील भोसरी येथील राहणारे आहेत. हे आरोपी पुण्याहून ठाण्यामध्ये बिबट्याची कातडी विक्री करण्यास आले होते. 

 
@@AUTHORINFO_V1@@