टपाल मतदान आणि चर्चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Oct-2020   
Total Views |

Postal Voting_1 &nbs
 
 
 
सध्या अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. प्रत्यक्ष मतदान हे जरी ३ नोव्हेंबर रोजी असले तरी, तेथे पोस्टाद्वारे मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. हीच प्रक्रिया सध्या अमेरिकेत चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याचे दिसून येते. कोरोनामुळे अमेरिकेत पहिल्यांदाच मोठ्या संख्येने लोक पोस्टाद्वारे मतदान करीत आहेत. टपाल मतपत्रिकेतून आतापर्यंत किमान ५० लाख मतदारांनी मतदान केले असल्याचे वृत्त आहे. अमेरिकेच्या वेगवेगळ्या राज्यात प्रत्यक्ष मतदानाच्या एक दिवस आधी जावूनदेखील मतदान करता येऊ शकते असा नियम आहे. अमेरिकेच्या बर्‍याच राज्यांत, मतदानाच्या दिवशी कोणतीही राष्ट्रीय सुट्टी नसते, प्रथम मते दिली जातात. परंतु, प्रत्येक राज्यात मतमोजणीची प्रक्रिया वेगळी असते. दि. ३ नोव्हेंबरपासून मतमोजणी सुरू होईल. तेव्हा यावेळी बरेच मुद्दे हे चर्चेत येण्याची शक्यता आहे. यापूर्वीचा सर्वात मोठा मुद्दा हा असेल की, मागील निवडणुकीच्या तुलनेत पोस्टल बॅलेटची संख्या खूप जास्त असेल. अंदाजानुसार निम्म्याहून अधिक मतदार पोस्टल बॅलेटवरुन मतदान करत असल्याची माहिती आहे. जर हा अंदाज बरोबर असेल तर मतदानाची गणना एका आठवड्यापेक्षा जास्त वेळ चालण्याचीदेखील शक्यता आहे. तसेच निवडणुकीत पुढे कोण आहे हे समजण्यासदेखील काही दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची दाट शक्यता आहे. कारण, टपाल मतपत्रिका बर्‍याच राज्यात आल्या असतील. परंतु, त्या उघडण्यासही मनाई आहे. म्हणजेच ३ नोव्हेंबर रोजी मोजणीची वेळ संपल्यानंतर या राज्यांत लाखोंमधील टपाल मतपत्रिका उघडता येतील. म्हणजेच आपण सहसा मतमोजणीच्या दिवशी प्रारंभिक ट्रेंड पाहतो ते पोस्टल बॅलेट्सचेच असतात. जी निवडणुकीच्या दिवसाआधी मोजली जातात. परंतु, मतमोजणीच्या शेवटच्या वेळी, मतमोजणीच्या दिवशी टपाल मतपत्रिका उघडल्या जातात, अशा टपाल मतांची संख्या ही निश्चितच जास्त असणार आहे. त्यामुळे त्या ऐनवेळी निर्णायक ठरण्याचीदेखील दाट शक्यता आहे.
 
 
यापूर्वी सन २०००च्या निवडणुकीत फ्लोरिडाच्या राज्यपालांना चांगली मते प्राप्त होत होती. परंतु, जेव्हा पोस्टल बॅलेटची मोजणी होऊ लागली तेव्हा ते मागे पडले. हे घडताच त्यांनी त्यावेळी त्यावर आक्षेप नोंदवत ही फसवणूक असल्याचे मत प्रदर्शित केले होते. त्याविरोधात त्यांनी न्यायालयातदेखील दाद मागितली होती. हा खटला पुढे जाऊन सर्वोच्च न्यायालयात गेला. यावरून आपण असा अंदाज बंधू शकतो की, यंदाच्या अध्यक्षीय निवडणुकीतदेखील असेच काही होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. जिथे सुरुवातीला एक उमेदवार हा जास्त मते प्राप्त करत होता आणि शेवटच्या काळातील मतमोजणीत दुसरा उमेदवार विजय होईल, अशी स्थिती निर्माण होण्याची देखील शक्यता आहे. अमेरिकेच्या निवडणुका या पोस्टल मतदानाला मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादामुळे अनेक शंकांनी युक्त अशाच झाल्या आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तज्ज्ञांच्या मते, मतमोजणीच्या प्रत्यक्ष वेळेपूर्वी कोस्फिअर थेअरी अनेक प्रकारांमुळे या शंकांना प्रोत्साहित केले जाण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी टपाल मतपत्रिकेत हेराफेरी होण्याची शक्यता असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. मात्र ते हे नेमके का होईल आणि कशा प्रकारे होईल यावर भाष्य करू शकलेले नाहीत. तज्ज्ञांचे मत आहे की, लोकांना यापुढे निवडणुकांच्या निकालांची प्रतीक्षा करण्याची जास्त वेळ सवय नसल्यामुळे मोजणीचा दिवस आणि त्यानंतर नवीन कोस्फीअर सिद्धांत येऊ शकतात. त्यामुळे सोशल मीडियाच्या युगात कोणतीही अफवा मोठी रूप धारण करू शकते आणि त्या नंतर जे काही घडेल त्याला नियंत्रणाखाली ठेवणेदेखील अवघड आहे. या भीतीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी दोन्ही उमेदवार अंतिम चर्चा करणार आहेत. तसेच यापूर्वी तीन वादविवाद कोरोनामुळे रद्द झाले आहेत. मागील चर्चेचा विचार करता, यावेळी चर्चेच्या काही अटीही बदलण्यात आल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेची निवडणूक प्रचारातील मुद्द्यांबरोबरच पोस्टल मतदानाच्या वाढत्या संख्येमुळे देखील वेगळे वळण घेण्याची शक्यता आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@