दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन विशेषांका’चे प्रकाशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Oct-2020
Total Views |

mumbai tarun bharat_1&nbs


पुणे :
धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधत दै. ‘मुंबई तरुण भारत’ने ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन विशेषांक’ प्रकाशित केला. विशेषांकाचे प्रकाशन शुक्रवार दि. २४ऑक्टोबर रोजी पुण्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार, बिझनेस हेड रविराज बावडेकर, भाजप अनुसूचित जाती-जमाती मोर्चाचे सदस्य आनंद शिंदे, दै. ‘मुंबई तरुण भारत’चे वितरण व्यवस्थापक जितेंद्र सोनावणे, उपसंपादिका योगिता साळवी उपस्थित होते. यावेळी आनंद शिंदे यांनी विशेषांकाबद्दल प्रस्तावना केली. यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच दै. ‘मुंबई तरुण भारत’द्वारे सामाजिक बांधिलकी जपत नवीन संकल्पना घेऊन नेहमीच अनेक उपक्रम राबवले जातात, विशेषांक प्रकाशित केले जातात, याबद्दल चंद्रकांतदादा पाटील यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार आणि संपूर्ण दै. ‘मुंबई तरुण भारत’चे अभिनंदन केले.
@@AUTHORINFO_V1@@