विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Oct-2020
Total Views |

Devendra Fadanvis_1 
मुंबई : भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्विटर्वरून त्यांनी ही माहिती दिली. सध्या ते क्वारंटाईन झाले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन फडणवीस यांनी ट्विटद्वारे केले आहे.
 
 
 
 
 
 
देवेंद्र फडणवीस हे बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रभारी म्हणून काम पाहत आहेत. मात्र, राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांनी तीन दिवस महाराष्ट्राचा दौरा केला. यात त्यांनी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या आहेत. त्यामुळे, आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन फडणवीस यांनी ट्विटरवरून केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@