सा. विवेक प्रकाशित 'राममंदिर ते राष्ट्र मंदिर' ग्रंथाचे ऑनलाइन प्रकाशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Oct-2020
Total Views |

sa vivek_1  H x



मुंबई :
सा. विवेक प्रकाशित 'राममंदिर ते राष्ट्र मंदिर' ग्रंथाचे ऑनलाइन प्रकाशन साध्वी ऋतंभरा, स्वामी रामदेव बाबा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.


कित्येक शतकांच्या संघर्षानंतर अखेर राममंदिर उभारणीला प्रारंभ झाला असला तरी भविष्यातील राष्ट्र मंदिर कसे असेल, परमवैभवशाली राष्ट्राच्या निर्मितीचा मार्ग कसा असेल याविषयी वेध सा. विवेक प्रकाशित 'राममंदिर ते राष्ट्र मंदिर' या ग्रंथात करण्यात आला आहे. सदर ग्रंथाचे ऑनलाइन प्रकाशन रविवार दि, २५ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी सात वाजता वात्सल्य ग्राम वृदांवनच्या साध्वी ऋतंभरा यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात येणार आहे. सोमवार दि, २६ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी सात वाजता योग गुरू, पतंजली योग विद्यापीठाचे विश्वस्त स्वामी रामदेव बाबा यांच्या हस्ते 'राम मंदिर ते राष्ट्र मंदिर' प्रकाशन होईल.


मंगळवार दि, २७ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी सात वाजता केंद्रिय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते राममंदिर ते राष्ट्र मंदिर' या ग्रंथाचे ऑनलाइन प्रकाशन करण्यात येणार आहे. वरील सर्व प्रकाशन साप्ताहिक विवेकच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनल वरून प्रसारण करण्यात येणार आहे. या ग्रंथ प्रकाशनाच्या सोहळ्याला आपली उपस्थिती लाभावी, असे आवाहन सा. विवेकच्यावतीने करण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@