रिपब्लिक टीव्हीच्या १ हजार कर्मचार्‍यांवर मुंबई पोलिसांनी नोंदविला गुन्हा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Oct-2020
Total Views |

arnab_1  H x W:


मुंबई :
शुक्रवारी (२३ ऑक्टोबर २०२०) मुंबई पोलिसांची बदनामी केल्याच्या आरोपाखाली वृत्तवाहिनी रिपब्लिक टीव्हीच्या ४ पत्रकारांसह चॅनलच्या जवळपास सर्व १००० संपादकीय कर्मचाऱ्यांविरोधात अजामीनपात्र कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिपब्लिक टीव्ही मीडिया नेटवर्कने यास उत्तर दिले आहे की, इतिहासामध्ये प्रथमच कोणत्याही वृत्तवाहिनीवर अशी कारवाई करण्यात आली आहे.आणीबाणीच्या काळातही असे माध्यमांच्या विरोधात कधी झाले नव्हते. आम्हाला भीती वाटत नाही, यावेळी फक्त मीच नाही, वाहिनीचे सर्व कर्मचारी यावेळी पोलिस ठाण्यात जातील.



त्याचवेळी रिपब्लिक चॅनलचे म्हणणे आहे की, चॅनलच्या संपूर्ण संपादकीय टीमविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याचा अर्थ असा की सुमारे १००० लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे. रिपब्लिक टीव्हीने याला 'मीडिया अधिकारांवर हल्ला' असे संबोधले आणि ते म्हणाले की, मुंबई पोलिसांनी केलेली कारवाई ही बदल्याच्या भावनेतून केली जात आहे. मुंबई पोलीस आयुक्तालय घटना व कायद्यापेक्षा वरचढ नसल्यामुळे वाहिनी या प्रत्येक प्रतिशोध कारवाईविरोधात 'कडक रणनीतीने लढा देईल. या संपूर्ण विषयावर रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी म्हणाले आहेत की, '१००० एफआयआर खूप कमी आहे, तुम्ही १ कोटी एफआयआर नोंदवा.आम्ही याला उत्तर देऊ कारण आम्ही घाबरत नाही. आम्ही सत्यासाठी संघर्ष करणारे लोक आहोत.' तसेच ते पुढे म्हणतात, 




अँकर आणि वरिष्ठ सहाय्यक संपादक शिवानी गुप्ता, उपसंपादक सागरिका मित्र, उपसंपादक शावन सेन, कार्यकारी संपादक नारायणस्वामी आणि संपादकीय कर्मचारी, तसेच न्यूजरुम प्रभारी, संबंधित न्यूज प्रसारित करण्यासाठी संपादकीय कर्मचारी आणि न्यूजरूम प्रभारी व इतर यांच्याविरोधात पोलीस (अप्रितिची भावना चेतवणे) अधिनियम १९२२ कलम ३(1) व भादंवि कलम ५००(बदनामी करणे) व ३४ (सामायिक कृत्य)अंतर्गत गुन्हा ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष शाखा-१च्या सोशल मीडिया लॅबमध्ये कार्यरत पोलिस उपनिरीक्षक शशीकांत पवार यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवार हे कार्यरत असताना बिगेस्ट न्यूज टुनाईट या मथळ्याखाली रिपब्लिक टीव्हीने २२ ऑक्टोबरला एक वृत्त प्रसारित केले होते. त्यात इतर तपास अधिकारी, पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात नकारात्मक प्रतिमा तयार करण्यात आली होती. या वृत्तामुळे मुंबई पोलिस दलाची विश्वासार्हता कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून पोलीस आयुक्तांची बदनामी करण्यात आल्यावरून पवार यांनी याप्रकरणी तक्रार केली.


भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय सदर कारवाईचा निषेध करताना म्हंटले, 'ही केवळ सूड घेण्याची कृती आहे. महाराष्ट्र शासन सूडबुद्धीने कारवाई करीत आहे. कॉंग्रेसचे चारित्र्य माध्यमांना रोखण्याचे आहे. महाराष्ट्रातील जनता त्यांना वेळ आली की उत्तर देईल. त्याच बरोबर वकील इश्करनसिंग भंडारी म्हणाले आहेत की, 'एक हजार कर्मचाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदविण्यामागची मानसिकता स्पष्ट आहे. भारताचे नंबर एक चॅनेल रिपब्लिक रोखण्याचा त्यांचा हेतू आहे.'
@@AUTHORINFO_V1@@