राजा तो रहे मस्ती में...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Oct-2020   
Total Views |

thailand_1  H x


गेल्या तीन महिन्यांपासून थायलंडचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत, मोर्चे काढत आहेत. आता कुणी म्हणेल त्यात आपल्या भारतीयांना, त्यातही महाराष्ट्राला काय नवीन? तर आपल्याला नवीन नाही. पण, थायलंडसाठी हे नवीनच आहे. तिथल्या नियमानुसार राजाविरोधात आंदोलन करणे काय, नुसते ‘ब्र’ उच्चारून विरोध केला, तरी त्या कृत्यासाठी १५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे. राजा आणि तिथल्या सत्ताधारी व्यक्तीला विरोध हा गुन्हाच समजला जातो.


‘आग लगे चाहे बस्ती में, राजा तो हमारा मस्ती में...’ असे संतापाने आणि दुःखाने म्हणण्याची वेळ थायलंडच्या जनतेवर आली आहे. सध्या थायलंडची जनता, तिथल्या राजा आणि पंतप्रधानांविरोधात रस्त्यावर उतरली आहे. त्यात मुख्यतः विद्यार्थी आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून थायलंडचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत, मोर्चे काढत आहेत. आता कुणी म्हणेल त्यात आपल्या भारतीयांना, त्यातही महाराष्ट्राला काय नवीन? तर आपल्याला नवीन नाही. पण, थायलंडसाठी हे नवीनच आहे. तिथल्या नियमानुसार राजाविरोधात आंदोलन करणे काय, नुसते ‘ब्र’ उच्चारून विरोध केला, तरी त्या कृत्यासाठी १५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे. राजा आणि तिथल्या सत्ताधारी व्यक्तीला विरोध हा गुन्हाच समजला जातो.
तरीही गेल्या तीन महिन्यांपासून तिथले युवक त्या शिक्षेला आणि राजालाही न जुमानता का बरं इतके आक्रोश करत आहेत? कारण, आधीच सांगितल्याप्रमाणे, ‘आग लगे चाहे बस्ती में...’ न्यायानुसार इथला राजा (महा वाचिरालोंगकोन) वागत आहे. सध्या जगभरात कोरोनाचे थैमान आहे. थायलंडमध्येही कोरोनाने कहर माजवला आहे. तिथेही कामधाम ठप्प आहेत. लोकांची रोजीरोटी हिरावली आहे. आर्थिक आणि मानसिक स्थैर्य पूर्णत: विस्कळीत झाले आहे. मृत्यू, दैन्य, दुःख यांच्या चक्रात तिथली जनता पिळून निघाली आहे. अशा वेळी जनतेने कुणाकडे पाहावे? कुणाच्या आशेवर राहावे? थायलंडमध्ये राजपद अबाधित असल्याने आणि राजा अगदी सुशेगात राजेशाही अवलंबत असल्याने लोकांना राजाकडूनच आस असणार, हे निश्चितच. तर, अशावेळी थायलंडच्या जनतेने राजाकडे मदतीच्या आशेने पाहावे, यात चुकीचे काही नाही. मात्र, इथे जनतेने राजाकडे मदत मागावी तरी कशी? कारण, राजाने कोरोनाच्या काळात प्रजेची काळजी घ्यायला हवी, ‘मैं हू ना’ म्हणत साथ द्यायला हवी, तर इथे राजाच देशातून पसार.

कोरोनाचा कहर देशात माजला असताना थायलंडचा राजा जनतेला वार्‍यावर सोडून जर्मनीला गेला. तोही एकटा नाही तर चार पत्नी, २०शाही सहयोगिनी आणि असंख्य नोकरचाकरासंमवेत राजा जर्मनीला रवाना झाला. कोरोनाकाळात शाही हॉटेल जगभर बंद आहेत. पण, या राजासाठी जर्मनीतले शाही हॉटेल सताड उघडले गेले. हॉटेलचा एक मजलाच राजासाठी उपलब्ध केला गेला. यातही एक मेख अशी की, थायलंडमध्ये १९३२ सालांपूर्वी राजघराण्यासाठी काही विशेष सवलती होत्या. त्यात राजा पत्नी सोडून इतर अनेक स्त्रियांना सहयोगिनी म्हणून दर्जा देऊ शकतो. या सहयोगिनी म्हणजे राजाच्या लैगिंक गुलामच! तर १९३२साली हा नियम मानवी आणि नैतिक मूल्यांचे स्मरण करून मोडित काढण्यात आला. पण, २०१४साली पुन्हा हा नियम पुनःस्थापित झाला. तर मुद्दा हा की, थायलंडमध्ये नव्हे तर जगभरात कोरोना, ‘लॉकडाऊन’मुळे कितीतरी लोक अन्नाला मोताद होत टाचा घासून मेले. कितीतरी लोक उपचाराअभावी तडफडत अवेळी मेले. मात्र, या अशा जागतिक आपत्तीमध्ये थायलंडचा राजा मौजमजेसाठी कुटुंबासोबतच नाही, तर २०सहयोगिनींसोबत जर्मनीला गेला, हे थायलंडच्या जनतेच्या दुःखावर मीठ चोळण्यासारखे आहे.

बरे, राजाचे प्रताप याआधीही अनेक आहेतच. जसे केवळ राजघराण्यात जन्म घेतला म्हणून केवळ भौतिक सुखाची हाव पूर्ण करायची हा एककलमी कार्यक्रम राजाने राबवला. थायलंड हा देश आहे, त्यातील जनतेला मान-अभिमान आहे, या विचारापासून थायलंडचा राजा वाचिरालोंगकोन हा कोसो दूर आहे. याचे उत्तम उदाहरण देता येईल. ते असे की, कोणत्याही देशासाठी त्याचे सैन्यदल हा अभिमानाचा विषय आहे. आस्थेचा विषय आहे. या राजा वाचिरालोंगकोनने काय करावे? तर, त्याने थायलंडच्या रॉयल थाय एअर फोर्सचे चिफ कुणाला बनवावे? या राजाचा अत्यंत लाडका कुत्रा होता पू. पू. राजाने त्याच्या या कुत्र्याला एअर फोर्सचे प्रमुख बनवले. याचा अर्थ काय घ्यावा? हाच की, राजाला देशाचे रक्षण करणार्‍या सैनिकांबद्दल आदर नाही की, आपलेपणा नाही. राजाने अनेक कृत्यातून थायलंडच्या जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. त्या सार्‍याचा स्फोट कोरोनाकाळात झाला. २०१४साली सत्ताबदल झाल्यावर देशाचे पंतप्रधान झालेला प्रयुत चान ओचा यांच्या{वरोधातही जनतेला राग आहे. कारण, सत्तेला टेकू मिळावा म्हणून या पंतप्रधानाने राजाचे अमर्याद अधिकार मान्य केले. बाद केलेले कितीतरी अवाजवी नियम पुन्हा लागू केले. जे नियम जनतेच्या मानवी हक्काचे उल्लंघन करत आहेत, तर आता थायलंडची जनता रस्त्यावर उतरली, तिथे संचारबंदी घोषित आहे. राजाने मात्र जाहीर केले आहे की, त्याच्या विरोधात आंदोलन केले तरी कुणालाही शिक्षा होणार नाही. मात्र, तरीही काही विद्यार्थ्यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. थायलंडच्या या आंदोलनाचे पडसाद जगभरात उमटले. आता या आंदोलनाचे पुढे काय होणार की, राजाचे ‘आग लगे चाहे बस्ती में’चे मस्तीगाणे सुरूच राहणार...

@@AUTHORINFO_V1@@