दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यात जिम सुरु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Oct-2020
Total Views |

Gyms_1  H x W:

मुंबई : दसऱ्याचा मुहूर्त साधून राज्यभरात आता जिम सुरु केले जाणार आहेत. येत्या २५ तारखेपासून जिम सुरु करण्यास राज्य सरकारने अखेर परवानगी दिली आहे. दुसरीकडे, लोकल प्रवासाची मुभा देण्यात न आल्याने प्रवास करताना सर्वसामान्य मुंबईकरांचे अतिशय हाल होत आहेत. यामुळे बेस्ट सेवेवर अतिरिक्त ताण पडत आहे. त्यातच सोशल डिस्टन्सिंग पाळले जावे यासाठी बेस्ट बसेस पूर्ण क्षमतेने चालवल्या जात नाहीत. मात्र आता बेस्ट बसेस पूर्ण क्षमतेने चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य सरकारने बेस्ट प्रशासनाला पत्र लिहिले आहे. 
 
 
 
 
जिम चालू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे जीम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र कंटेन्मेंट झोनमधील जीम बंदच राहणार आहेत . अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसोबतच सर्वसामान्यांना नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्याचा निर्णय पुढील २-३ दिवस घेण्यात येणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी दिली. राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाकडून लवकरच लोकल प्रवासाबद्दल निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्त्यांनी सांगितले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@