मुख्यमंत्र्यांकडून ३ हजार कोटींचा घोटाळा : किरीट सोमैया

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Oct-2020
Total Views |

Kirit Somaiya_1 &nbs
 
मुंबई : भांडुप येथे कोविड सेंटर येथील जमीन ही महाराष्ट्र सरकारची आहे. ती एका व्यक्तीला साठ वर्षांसाठी भाड्याने दिली होती. पण २२ एकर जमीन महाराष्ट्र सरकारने महापालिकेला कोविड सेंटर उभारण्यासाठी ओळखीचा बिल्डरच्या सहाय्याने ३ हजार कोटीला भाडेतत्त्वावर घेतली. त्यामधून मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत केला.
 
 
“मुंबई महापालिकेने ५ हजार बेड्सचे रुग्णालय उभारण्यासाठी खाजगी जागा हवी आहे, अशी जाहिरात दिली. २३ ऑगस्ट २०२०ला २ कंपन्यांनी प्रस्ताव सादर केले होते. यामधील दिलीप शहा यांचा प्रस्ताव बोगस होता. कारण ती त्यांच्या मालकीची जागा नव्हती. महापालिका व जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती अधिकारानुसार भांडुपच्या जागेचा प्रस्ताव तांत्रिकदृष्ट्या योग्य नाही. तरीही भांडुपचा प्रस्ताव निवडला. हे कागदोपत्री दाखविण्यासाठी हा खेळ केला गेला.” अशी टीका यावेळी किरीट सोमैया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे.
 
 
किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “कोविड सेंटरसाठी २२ एकर जागेची किंमत २ हजार ते ३ हजार कोटी रुपये एवढी आहे. मुंबई महापालिकेने या रुग्णालयासाठी सर्व अहवाल तयार केले. वास्तुविशारदाने रुग्णालयासाठी १० हजार कोटी रुपये खर्च येईल असा प्रस्ताव तयार केला गेला. या सर्व गोष्टीची पूर्तता २ महिन्यात झाली. पालिका व राज्य सरकारच्या ९ जणांच्या समितीने शिफारस केलेली ही जागा मुळातच वादात आहे. स्वास कन्स्ट्रक्शनच्या मालकाने जमिनीच्या भाडेधारकाच्यावतीने १ ऑक्टोबर रोजी ६१ कोटी ६५ लाख ७९ हजार ३ रुपये भरून या जागेचा ताबा घेण्यात आला.”
 
 
@@AUTHORINFO_V1@@