आंतरराष्ट्रीय प्रवाशांना भारतात येण्याचा मार्ग मोकळा : पर्यटकांना बंदी कायम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Oct-2020
Total Views |
Visa _1  H x W:


केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : अनलॉक ५.० अंतर्गत केंद्र सरकारने व्हिसावरील निर्बंध शिथील केले आहेत. परदेशी नागरिकांना भारतात यायचे असेल, तर त्यांना प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली आहे. फक्त पर्यटन व्हिसाला अजून परवानगी देण्यात आलेली नाही. इलेक्ट्रॉनिक व्हिसा आणि पर्यटक व्हिसा वगळता सर्व व्हीसा तात्काळ प्रभावाने पूर्ववत करण्यात येत असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. 

व्हिसाची मुदत संपली असेल तर, ते नव्याने व्हिसासाठी अर्ज करु शकतात. या निर्णयामुळे व्यवसाय, कॉन्फरन्स, नोकरी, अभ्यास, संशोधन आणि वैद्यकीय उपचारांसाठी परदेशी नागरिक भारतात येऊ शकतात. गृहमंत्रालयाने एक परिपत्रक जाहीर करत ही माहिती दिली आहे. ओसीआय आणि ओपी पीआयओ कार्ड धारकांना आणि सर्व विदेशी नागरिकांना भारतात पर्यटन व्हिसा वगळता भारतात येण्यास परवानगी देण्यात आली आहे.



केंद्र सरकारने फेब्रुवारी २०२० पासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांना भारतात येण्याजाण्यासाठी बंधने आणली होती. कोरोना विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय आवक जावक रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र, परदेशी नागरिकांना पर्यटन वगळता भारतात येण्यासाठी मंजूरी देणार आहे.


@@AUTHORINFO_V1@@