संवेदनशील नाशिक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Oct-2020   
Total Views |

nashik _1  H x



नाशिक पोलीस आयुक्तांनी नाशिकमध्ये ‘आयएसआय’ एजंटचे जाळे विणले जात असल्याची शंका उपस्थित केली आहेच. त्यामुळे नाशिकनगरीची सुरक्षा ही ऐरणीवर आली आहे.नाशिकचा उल्लेख थेट ‘आयएसआय’द्वारे होणे, तसेच नाशिक ‘आयएसआय’च्या नजरेस येणे, हे मोठे धोक्याचे लक्षण आहे, हे नक्की!



महाराष्ट्रासह संपूर्ण जगात नाशिकची ओळख ही तीर्थक्षेत्र म्हणून आहे. मात्र, पौराणिक आणि आध्यात्मिक वारसा लाभलेले नाशिक सध्या संवेदनशील बनत चालल्याचे दिसते. गेल्या काही दिवसांत ‘एचएएल’मधील हेरगिरी प्रकरण व त्यापूर्वी देवळाली येथील लष्करी हद्दीचे छायाचित्र प्रसिद्ध करण्याचे प्रकरण समोर आले आहे. काही ठरावीक दिवसांच्या अंतराने थेट राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित घटना नाशिकमध्ये समोर आल्याने नाशिकसह देशाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह समोर उभे ठाकले आहे.घडलेल्या दोन घटनांवरून नाशिक संवेदनशीलतेच्या केंद्रस्थानी असल्याचेच दिसून येते. नाशिकमध्ये ‘एचएएल’, ‘सिक्युरिटी प्रेस’, ‘आर्टिलरी सेंटर’, ‘रडार स्टेशन’, ‘नोट प्रेस’, ‘कर्षण कारखाना’ अशी विविध महत्त्वाची आस्थापने आहेत. त्यामुळे यांची सुरक्षा हा मोठा मुद्दा आहेच.नाशिक पोलीस आयुक्तांनी नाशिकमध्ये ‘आयएसआय’ एजंटचे जाळे विणले जात असल्याची शंका उपस्थित केली आहेच. त्यामुळे नाशिकनगरीची सुरक्षा ही ऐरणीवर आली आहे.नाशिकचा उल्लेख थेट ‘आयएसआय’द्वारे होणे, तसेच नाशिक ‘आयएसआय’च्या नजरेस येणे, हे मोठे धोक्याचे लक्षण आहे, हे नक्की!

नाशिकमध्ये असलेल्या महाराष्ट्र पोलीस अकादमीची यापूर्वी झालेली रेकी हा विषय अजूनही नाशिककरांच्या मनात ताजा आहे. अशावेळी सध्या घडणार्‍या घटना या नक्कीच विचार करायला लावणार्‍या आहेत. स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांच्या समोर यामुळे नक्कीच एक मोठे आव्हान उभे ठाकले आहे. दैनंदिन होणार्‍या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना, नाशिक जिल्ह्यातील अवैध धंदे, सोनसाखळी चोरी आदींचे एक मोठे संकट नाशिककर नागरिकांवर सध्या मोठ्या प्रमाणात घोंगावत आहेच. त्यात आता ‘आयएसआय’च्या हालचालीचीही भरीस भर पडली आहे. अशावेळी शहर पोलिसांना आपल्या नेहमीच्या कार्यपद्धतीखेरीज नव्या पद्धतीने या सर्व आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. रस्त्यावर उभे असणारे पोलीस ते आयपीएस अधिकारी अशा सर्वांनाच आपल्या भूमिकेचा आणि कार्यपद्धतीचा यामुळे पुन्हा फेरविचार करावा लागेल हे नक्की. नाशिक हे संवेदनशील न राहता, तीर्थक्षेत्रच असण्याकामी संघटित प्रयत्नांची गरज प्रतिपादित होत आहे.


गरज सजगतेची...


नाशिकनगरी ही संवेदनशीलतेच्या उंबरठ्यावर असताना कोणतीही अघटित घटना घडू नये, यासाठी सजगता बाळगणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. प्रशासन आणि पोलीस हे आपले कार्य निश्चितच करतील, नव्हे ते करणे त्यांचे कर्तव्यच आहे. मात्र, नाशिकनगरीत वास्तव्यास असणार्‍या नाशिककर नागरिकांचेही काही कर्तव्य आहेच. नागरिकांनी सहजरीत्या दिसून येणार्‍या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून त्याची माहिती पोलीस अधिकारी यांना देणे आवश्यक आहे. तसेच, नाशिकमध्ये विशिष्ट आस्थापनात कार्यरत असणार्‍या नोकरदारवर्गाच्या काही ठरावीक ठिकाणी वस्त्या आहेत. त्यात इतर ठिकाणी कार्यरत असणारे नागरिकदेखील वास्तव्यास आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी एकदम कोणी श्रीमंत होणे, एखाद्याची जीवनशैली एकदम बदलणे, असे काही आढळल्यास त्याची माहिती नागरिक म्हणून सुरक्षा यंत्रणेला देणे नक्कीच आवश्यक आहे.नाशिकमध्ये असलेल्या आस्थापनांच्या ठिकाणी मोबाईलबंदी आहे. मात्र, तरीही मोबाईल आत नेला गेला. असे समोर आले आहे. अशावेळी या आस्थापनांच्या सुरक्षायंत्रणेनेही सजगता बाळगत आपले कर्तव्य करणे नक्कीच आवश्यक आहे.


नाशिक हे पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे येथे अनेक नागरिक हे कायम येत असतात. अशा नागरिकांच्या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे, विविध विक्रेते हे त्यांच्याकडे येणारे ग्राहक व त्यांची वार्तालापाची पद्धती, पैसे देण्याची रीत आदी बाबींवर लक्ष देत सहज सुरक्षाकामी आपले योगदान देऊ शकतात. नागरिकांनी आता आपले कान आणि डोळे उघडे ठेवण्याची नक्कीच गरज निर्माण झाली आहे, तसेच सुरक्षासंबंधी आणि अति महत्त्वाच्या आस्थापनांत कार्यरत असणार्‍या कर्मचारीवर्गानेही प्रलोभनांपासून दूर राहणे आवश्यक आहे. आपल्या आस्थापनांतील कार्यपद्धतीची माहिती कोणालाही न देणे, हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. नागरिकांनी या छोट्या मात्र मोठा अनर्थ टाळणार्‍या बाबतीत सजगता बाळगल्यास सुरक्षाचक्र अधिक बळकट होण्यास मदत होईल. केवळ प्रशासन आणि पोलीस यांच्या शिरावर शहर सुरक्षेची जबाबदारी नसून, ते नागरिकांचेदेखील कर्तव्य आहे, याची जाणीव आता सर्वांनीच ठेवणे आवश्यक आहे.

@@AUTHORINFO_V1@@