'वचनपूर्ती न केल्यास भाजपचे जनआंदोलन'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Oct-2020
Total Views |

pravin darekar_1 &nb



सातारा
: विधानसभा निवडणुकांपूर्वी बांधावर जाऊन शेतकर्‍यांना दिलेले वचन मुख्यमंत्र्यांनी आता तरी पूर्ण करावे, अन्यथा भाजप सरकारविरुध्द टोकाचा संघर्ष करुन राज्यभर जनआंदोलन उभारेल असा जोरदार इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज दिला.

दरेकर यांनी आज सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील रीटकवली, बिबवी या नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला, तसेच सातारा तालुक्यामधील गजवडी, सोणवडी, कारी या गावाचाही दौरा केला. यावेळी सोबत आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, डॉ. सचिन साळुंखे, मनिष महाडवाले, राजू भासले, नगरसेवक सुनिल काळेकर, करण पोरे, सुवर्णाताई पाटील, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्या सूनिशा शहा,विकास गोसावी आदि उपस्थित होते. दरेकर यांनी थेट शेतक-यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि शेतकर्‍यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. पुरामुळे पीक पाण्याखाली गेली आहेत. अतिवृष्टीमुळे ज्वारी-बाजरीच्या पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. शेतात पाणी साचून पिकेही पिवळी पडली आहेत. या नुकसानीने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. यासंदर्भात साताराचे चे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेतली व त्यांच्यासमवेत जिल्ह्यातील अतिवृष्टीसंदर्भात चर्चा केली.



पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर यांनी सरकारने आता तरी दिलेला शब्द पाळावा आणि तत्काळ शेतकर्‍यांना मदत देण्याची मागणी केली. साताऱ्यातील अतिवृष्टीमुळे शेती उद्ध्वस्त झाली आहे. शेतकरी अतिशय दयनीय अवस्थेत आहे. सातारा जिल्ह्यात अल्पभूधारक शेतकरी आहेत, त्यामुळे त्यांना हे नुकसान परवडणारे नाही. अतिवृष्टीमुळे शेती पूर्णपणे उखडली गेली आहे. त्या शेतीवर सावकार, बँकांचे कर्ज आहे. त्यामुळे नेमके काय करावे अशा चिंतेत शेतकरी आहे. शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे पंचनामे, आश्वासन, बैठका या भानगडीत न पडता शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणीही दरेकर यांनी केली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी कसलेल्या जमिनीही खचून गेल्या आहेत. त्या जमिनीवर पुन्हा पीक लावण्याकरिता शेतकऱ्यांना सुमारे ४ ते ५ लाख रुपयांची आवश्यकता आहे. सरकारने मदतीचे जे निकष ठरवले आहेत ती तुटपुंजे आहेत. त्यामुळे आम्ही सरकारला हे निकष बदलयाला लावून शेतकऱ्याला दिलासा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.



एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत असे सांगताना दरेकर म्हणाले की, भाजप एका व्यक्तीचा पक्ष नाही. जाणारा माणूस कोणावर तरी आरोप करतो. देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत असूया व आकस राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मनात आहे. पाच वर्ष ज्याप्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले, त्याबद्दलची त्यांना असुया आहे. एकनाथ खडसे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून देवेंद्र फडणवीस यांची छबी बदनाम करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष करत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
@@AUTHORINFO_V1@@