ममताबानोंचे मुस्लीम तुष्टीकरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Oct-2020   
Total Views |
Mamata_1  H x W
 
 
 
ममता बॅनर्जींनी हिंदूंनाच फाट्यावर मारत मुसलमानांच्या दाढ्या कुरवाळण्याचेच उद्योग केले. याचा कहर तर तेव्हा झाला, जेव्हा राम मंदिर भूमिपूजनाच्या शुभ दिनीच, म्हणजे ५ ऑगस्टलाच बॅनर्जींनी राज्यभर ‘लॉकडाऊन’ घोषित केला. उद्देश हाच की, हिंदूंनी रस्त्यांवर उतरून त्यांचा आनंदसोहळा सामूहिकपणे साजरा करू नये. पण, भाजपच्या बंगालमधील वाढत्या प्राबल्यामुळे ममता बॅनर्जींनी आगामी निवडणुका लक्षात घेता, हिंदू मतदारांना आकृष्ट करण्याकडे आपला मोर्चा वळवलेला दिसतो. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा दुसरा कार्यकाळ मे २०२१ मध्ये संपुष्टात येईल. पण, आतापासूनच बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप संघर्ष शिगेला पोहोचलेला दिसतो. कारण, लोकसभा निवडणुकीत भाजपने तब्बल १८ जागा जिंकत ४० टक्के मतेही मिळवली, ज्याचा ममता बॅनर्जींना जोरदार झटका बसला. ममता बॅनर्जी यांच्या मुस्लीम तुष्टीकरणाच्या धोरणांमुळे ‘ममतादीदीं’ची ओळख बंगालमध्येच नव्हे, तर देशभरात ‘ममताबानो’ अशीच झाली. लोकसभा निवडणुकीपूर्वी ममतांनीही याकडे फारसे लक्ष न देता, हिंदू मतदारांना गृहित धरण्याची चूक केली. पण, या निवडणुकीत हिंदू मतदारांनी मतपेटीतून ममतांना त्यांची जागाही दाखवून दिली. खरं तर २०१२ साली सत्तेत आल्यानंतरच ममता बॅनर्जींनी मुस्लीम मतपेढी पूर्णपणे काबीज करण्याच्या पद्धतशीरपणे हालचाली सुरू केल्या. इमामांना प्रत्येकी अडीच हजार रुपये आणि मशिदीत अझान देणार्‍यांना १,५०० रुपये भत्ता सरकारी तिजोरीतून वळविण्याची त्यांची योजना होती. परंतु, भाजपने या एकतर्फी निर्णयाला कोलकाता उच्च न्यायालयात आव्हान देऊन या निर्णयावर स्थिगिती आणली. त्यानंतर ममतांनी मात्र पुढच्या दारातून नाही ना, मग वक्फ बोर्डाच्या माध्यमातून हे पैसे वर्ग केलेच. पण, पुरोहित आणि ब्राह्मणांच्या भत्त्याच्या मागणीकडे मात्र त्यांनी कायमच डोळेझाक केली. आपण एकदमच मुस्लीमधार्जिणे झालो आहोत, असा संदेश हिंदू मतदारांमध्ये जाऊ नये म्हणून मग त्यांनी मकर संक्रातीला हुबळीच्या संगमावर दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने संपन्न होणार्‍या गंगासागर मेळ्याच्या विकासाला आर्थिक साहाय्य केल्याचा दिखावा केला. पण, दुसरीकडे बंगालमध्ये रामनवमी, हनुमान जयंतीलाही तृणमूलने कडाडून विरोेध केला. एवढेच नव्हे, तर मोहरममुळे दुर्गाविसर्जन पुढे ढकलण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे मोठा वादंग झाला. पण, ममता बॅनर्जींनी तरीही हिंदूंनाच फाट्यावर मारत मुसलमानांच्या दाढ्या कुरवाळण्याचेच उद्योग केले. याचा कहर तर तेव्हा झाला, जेव्हा राम मंदिर भूमिपूजनाच्या शुभ दिनीच, म्हणजे ५ ऑगस्टलाच बॅनर्जींनी राज्यभर ‘लॉकडाऊन’ घोषित केला. उद्देश हाच की, हिंदूंनी रस्त्यांवर उतरून त्यांचा आनंदसोहळा सामूहिकपणे साजरा करू नये. पण, भाजपच्या बंगालमधील वाढत्या प्राबल्यामुळे ममता बॅनर्जींनी आगामी निवडणुका लक्षात घेता, हिंदू मतदारांना आकृष्ट करण्याकडे आपला मोर्चा वळवलेला दिसतो.
 
 

दीदींना आली हिंदूंची आठवण

 
 
आणि निवडणुकीच्या भीतीपोटी हा होईना, ‘ममताबानो’ या ‘ममतादीदी’ झाल्या, असे म्हटले तर वावगे ठरू नये. कारण, बंगालमधील दुर्गापूजा, या सर्वात मोठ्या साजर्‍या होणार्‍या हिंदूंच्या धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने, हिंदू मतदारांना आकृष्ट करण्याचा ममतादीदींनी प्रयत्न केलेला दिसतो. दुर्गापूजा मंडळांना प्रत्येकी ५० हजार रुपये, तर राज्यातील ८० हजार फेरीवाल्यांना या महिन्यासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याची घोषणा ममतादीदींनी केली. इतकेच नाही तर गेल्या वर्षी या दुर्गापूजा मंडळांना दिली गेलेली २५ टक्के वीजबिलावरील सूट वाढवून यंदा ५० टक्के करण्यात आली आहे. शिवाय, दुर्गापूजा आयोजकांना कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता, पालिकेला कोणतेही शुल्क न भरण्याचा दिलासाही ममतादीदींना दिला. आता याला उशिरा सुचलेले ‘स्वार्थी’ शहाणपण नाही तर मग काय म्हणावे? ऑगस्ट २०१९ मध्ये ‘पश्चिम बंगाल राज्य सनातन ब्राह्मण ट्रस्ट’तर्फे कोलकातामध्ये हजारो पुरोहितांनी त्यांच्या नऊ मागण्यांसाठी आंदोलन केले होते. त्यावेळीही ममता सरकारमधील एका मंत्र्याने या पुरोहितांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासनही दिले होते. परंतु, सप्टेंबरमध्येच राज्य सरकारने पुरोहितवर्गाच्या केवळ दोन मागण्यांची पूर्तता करण्याबाबतच निर्णय घेतला. यामध्ये राज्यातील आठ हजार गरीब सनातन ब्राह्मण पुरोहितांसाठी महिन्याला एक हजार रुपये भत्ता आणि मोफत घरे देण्याची घोषणाही करण्यात आली. त्यामुळे ममतादीदींनी पुरोहितवर्गाला खूश करून हिंदू मतदारांमध्ये एक सकारात्मक संदेश देण्याचा केलेला हा प्रयत्न म्हणावा लागेल. पण, अशाप्रकारे हिंदू मतदारांची मनं आणि मतं दोन्ही आपल्याला जिंकता येतील, या आविर्भावात दीदींनी अजिबात राहू नये. कारण, हिंदू मतदारांना धर्माच्या नावाखाली अशाप्रकारे तात्पुरते भुलविण्याचा जमाना आता गेला. त्यातच गेल्या काही वर्षांत खासकरून बंगाली हिंदू मतदारांसमोर ममतादीदींचे खरे रूप समोर आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानातून ममतादीदींवरील आपला रोषही हिंदू मतदारांनी दाखवून दिलाच, म्हणूनच आधी इमामांना मदत करणार्‍या ममतांवर पुरोहितवर्गाला मदत करण्याची वेळ आली. परंतु, हा वरकरणी मलमपट्टीचा आव आणून हिंदूंची मते यंदा मात्र ममतादीदींना खिशात घालता येणार नाहीत. कारण, जिथे ‘जय श्रीराम’च्या घोषणेलाही विरोध केला जातो, त्या भूमीवरचा हिंदू मतदार दीदींना यंदा धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.



@@AUTHORINFO_V1@@