संघाचे रायगड जिल्हा सहकार्यवाह कौस्तुभ सोहोनी यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Oct-2020
Total Views |

Koustubh Sohoni RSS_1&nbs
 
पनवेल : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रायगड जिल्हा सहकार्यवाह कौस्तुभ सोहोनी यांचे शनिवार,१७ ऑक्टोबर रोजी दुपारी दु:खद निधन झाले. ते किडनीच्या विकाराने त्रस्त होते. कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. रायगड जिल्ह्यात संघाचे अनेक कार्यकर्ते घडविण्याचे महत्त्वपूर्ण काम कौस्तुभ यांनी केले होते. ते संघाचे प्रचारक ही राहिले होते. मृत्युसमयी ते ३५ वर्षांचे होते.
 
 
रायगड जिल्ह्यातील रा. स्व. संघाचे धडाडीचे नेतृत्व म्हणून कौस्तुभ सोहोनी यांच्याकडे पाहिजे जात असे. हिंदुत्व चळवळीचे कार्यकर्ते, अभ्यासू शिवभक्त अशी त्यांची ख्याती होती. संघात तालुका कार्यकर्ता, जिल्हा महाविद्यालयीन प्रमुख आणि जिल्हा सहकार्यवाह अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. जिल्ह्याच्या सर्वदूर भागात संघ कामाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अतिशय मेहनत केली.
 
 
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, स्थानिक उत्सव समितीद्वारे आयोजित कार्यक्रमांमध्ये ते सक्रीय सहभागी होत असत. झपाटलेपण, नेतृत्व गुण, वक्तृत्व, संवाद कौशल्य, कार्यतत्परता याच्या आधारे कौस्तुभ सोहोनी यांनी रायगड जिल्ह्यात अनेक संघ कार्यकर्ते, स्वयंसेवक तयार केले. त्यांचा मित्रपरिवारही मोठा होता. अवघ्या ३५व्या वर्षी त्यांच्या झालेल्या निधनामुळे रायगड जिल्ह्यातील संघ कार्यकर्त्यांनी, परिवारातील संस्थांनी आणि संघटनेने एक हरहुन्नरी कार्यकर्ता गमावला आहे. त्यांच्या पश्चात आई वडील, मोठा भाऊ आणि बहिण असा परिवार आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@