राहुल गांधींच्या '१५ मिनिटे' वक्तव्यावर गृहमंत्र्यांचा पलटवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Oct-2020
Total Views |
Amit Shah _1  H
 
 
 


नवी दिल्ली : १५ मिनिटांत चीनला पळवण्याची भाषा करणाऱ्या राहुल बाबांनी १९६२ वेळी स्वतःचा सल्ला ऐकायला हवा होता. त्यावेळी भारत चीनमध्ये युद्ध झाले होते. भारताला आपल्या कित्येक हेक्टर जमीन गमवावी लागली होती. शाह यांनी राहुल गांधी यांच्या विधानावर पलटवार करताना हे उत्तर दिले आहे. हरियाणा येथील ७ ऑक्टोबरच्या सभेत राहुल गांधींनी हे वक्तव्य केले होते. भारत-चीन सीमा तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे सरकार १५ मिनिटांमध्ये चीनी सैन्याला हाकलवून लावेल, असे म्हटले होते.
 
 
 
एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह यांनी हे उत्तर दिले आहे. १५ मिनिटांमध्ये चीनी सैन्याला हाकलवून लावण्याचा फॉर्म्युला राहुल गांधींना १९६२ मध्ये का वापरला नाही, असा खोचक सवाल अमित शाह यांनी विचारला आहे. जर तसे झाले असते तर कित्येक हेक्टर भारतीय जमीन आपल्याला गमवावी लागली नसतील. तत्कालील पंतप्रधानांनी आकाशवाणीवर बाय बाय आसामही म्हटले होते. काँग्रेसला या मुद्द्यावरक कुठली शिकवण द्यायची आहे. त्यांचेच कुटूंबिय सत्तेत होते. त्याकाळात काँग्रेस सरकारच्या हातातून हे क्षेत्र निसटले आहे.
 
 
 
बिहार रेजिमेंटच्या जवानांना १५-१६ जून दरम्यान रात्री गलवान घाटीत चीनू सैन्याने आक्रमण करण्यापासून रोखले होते. त्यावर अमित शाह म्हणाले, “मला बिहारच्या १६ रेजिमेंट सैनिकांवर गर्व आहे. कमी कार्यकाळात त्यांनी मैदानावरील संघर्षाला जबरदस्त तोंड दिले. खराब हवामानाच्या स्थितीत त्यांनी देशाचे संरक्षण करण्याची जबाबदारी स्वतःवर उचलली.” चीनी सैन्याशी झालेल्या हिंसक झटापटीत २० भारतीय जवानांना आपले प्राण गमवावे लागले होते.
 
 
 
शाह यांनी भारत-चीनच्या वादावर सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. दोन्ही देशांतील तणावाची स्थिती सैहार्दपूर्ण वातावरणात निवळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. राहुल गांधी म्हणाले होते की, आम्ही सत्तेत असतो तर चीनची भारतात पाऊल ठेवण्याची हिंम्मत झाली नसती.”




 
@@AUTHORINFO_V1@@