यंदाच्या दिवाळीत करू स्त्री सशक्तीकरणाचा संकल्प

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Oct-2020
Total Views |
vivek rural development c





'विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर'च्या वनवासी भगिनींनी तयार केलेल्या कंदिलांचे राज्यपालांतर्फे कौतूक





मुंबई : वनवासी भागात सामाजिक, शैक्षणिक व रोजगार निर्मितीसाठी कार्य करणाऱ्या 'विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर'च्या वनवासी भगिनींनी तयार केलेल्या पर्यावरण पूरक बांबूचे आकर्षक कंदील राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ह्यांना राजभवनात भेटीदाखल देण्यात आले. यावेळी विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरचे व्यवस्थापक लुकेश वासुदेव बंड, प्रशिक्षण व विकास अधिकारी सौ. प्रगती सचिन भोईर, श्रीशिवराजाभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड व सदस्य,रायगड विकास प्राधिकरण कार्याध्यक्ष पांडुरंग ताठेले व सामाजिक कार्यकर्ते भगवान कोंडलेकर उपस्थित होते.

यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 'विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर'च्या वनवासी भगिनींनी बनविलेल्या बांबूच्या वस्तूंचे कौतुक केले. तसेच रक्षाबंधन सणाच्यावेळी बांबूनिर्मित राख्यांना नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत या वनवासी महिलांचा उत्साह वाढविला, याबद्दल आभार मानत यंदाच्या दिवाळीत पर्यावरण पूरक आकर्षक आदिवासी महिलांनी बनविलेल्या बांबू कंदिलांचा जास्तीत जास्त वापर जनतेने करावा व या महिलांना सन्मानजनक रोजगार मिळवून देण्यात हातभार लावावा असे आवाहन देखील केले.
 
 

 
 
 
 
 
'विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर'च्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून महिला सक्षमीकरणा करिता पालघर जिल्हातील वनवासी, गरजू महिलांना घरकाम सांभाळून आर्थिक हातभार लाभावा व त्यांना सन्मानजनक रोजगार प्राप्त व्हावा या हेतूने विवेक या संस्थेने पुढाकार घेत अशा महिलांना बांबू हस्तकलेचे मोफत प्रशिक्षण देत आहे. त्यांचाकडून पर्यावरणपूरक बांबू हस्तकलेच्या बहुउपयोगी निरनिराळ्या वस्तू तयार करतात. यामध्ये बांबू हस्तकलेचा समावेश असून प्रशिक्षित महिला २१ प्रकारची आकर्षक उत्पादने तयार करत आहेत.



याचाच एक भाग या संस्थमार्फत स्वदेशी आकाशकंदीलची निर्मिती करण्यात आली आहे. हे आकाशकंदील पूर्णतः स्वदेशी व पर्यावरण पूरक बांबूनिर्मित आहेत. यात पाच प्रकारचे आकाशकंदील बनविण्यात आले आहे. यात गुरु आकाशकंदील, शुक्र आकाशकंदील, सप्तर्षी आकाशकंदील, ध्रुव आकाशकंदील याचा समावेश आहे. सर्व प्रकारच्या रंगांमध्ये हे उपलब्ध आहेत. या बांबूनिर्मित आकाशकंदिलाच्या खरेदीसाठी संपर्क: ७७९८७११३३३ या नंबरवर सकाळी ११ ते संध्याकाळी ७ यावेळेत संपर्क साधावा. तसेच या आकाशकंदीलबाबत आपले नातेवाईक, परिचित व मित्रमंडळ यांना माहिती करून देते स्वदेशी पर्यावरणपूरक वस्तूंच्या वापरासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहनही संस्थेमार्फत करण्यात आले.








@@AUTHORINFO_V1@@