“शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका”

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Oct-2020
Total Views |
 
Devendra Fadanvis_1 
 
 
 
उस्मानाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा केला. मात्र, त्यांच्या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा मिळाला का, असा सवाल उपस्थित करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसेच, “मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात काही जणांना चार हजार, पाच हजार अशी मदत देण्यात आली. अशा प्रकारची मदत करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करु नये,” असे यावेळी त्यांनी सांगितले. उस्मानाबादमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली.
 
 
 
“मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात एरवीच्या सरासरीपेक्षा खूपच जास्त पाऊस पडला. या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. कापणीला आलेली पिके आणि कापून ठेवलेली पिके दोन्ही पाण्यात भिजली. त्यामुळे पुणे, सोलापूर आणि उस्मानाबादमधील अनेक गावांमध्ये गुरांना देण्यासाठी चाराही उरलेला नाही. तसेच पिकांच्या नुकसानीबरोबरच अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अतिवृष्टीमुळे खरवडून गेल्या आहेत. शेतकऱ्यांना माती आणून जमिनीची मशागत करण्यासाठी एकराला साधारण ५० हजाराचा खर्च येतो. त्यामुळे सरकारने आता या खरवडून गेलेल्या जमिनी पुन्हा तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. त्यासाठी विशेष योजना आखावी लागेल.” अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
 
 
 
“जे सत्तेत असतात त्यांनी संयम दाखवायचा असतो. पण तेच राजकीय बोली बोलत आहेत. हे योग्य नाही. मला राजकारणात रस नाही. तुम्ही राजकीय बोललात तर मी राजकीय बोलेन. संवेदनशीलता दाखवत शेतकऱ्यांना काय दिलासा देता येईल? अशा वक्तव्याची अपेक्षा आपण राज्य सरकारकडून करत आहोत. शरद पवारांना सगळे माहिती असताना जाणुनबुजून केंद्राकडे टोलवत आहेत. पंतप्रधान संवेदनशील आहेत ते मदत करतील. युपीएपेक्षा जास्त मदत सरकार करेल. या सरकाराचा नाकर्तेपणा झाकण्याची जबाबदारी शरद पवारांवर आहे. ते सरकारचा बचाव करत असून चांगली कामगिरी करत आहेत. त्यांच्या इतका जाणकार कोणीच नाही.” अशी टीका करत शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@