राजस्थान : दोन बहिणींवरील बलात्कार प्रकरणी काँग्रेस गप्प का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Oct-2020
Total Views |
Rape case_1  H



जबाब बदलला नाही तर आई-वडिलांना मारून टाकू : पीडितांना धमकी

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये दोन बहिणींवरील बलात्कार प्रकरण अद्याप शांत झालेले नाही. अजमेरमध्ये एका महिलेवर बलात्काराचे प्रकरण उघडकीस आले आहे. सोशल मीडियावर या प्रकरणाला सामुहीक बलात्कार मानले जाते आहे. मात्र, राजस्थान पोलीसांनी याला नकार दिला आहे. यात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
 
 
अजमेरच्या या घटनेत पोलीसांनी पीडित महिलेची तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी कारवाई सुरू केली असून या प्रकरणी आरोपींचा तपास सुरू झाला आहे. एक आरोपी अटकेत आहे. अजमेर पोलीसांनी गुरुवारी कलम १६१ अंतर्गत पीडितेचा जबाब नोंदवला आहे. पोलीसांनी अटक आरोपीचीही चौकशी सुरू केली आहे, हे एक जूने प्रेमप्रकरण असून त्याला बलात्कार म्हटले जात आहे, असा दावा पोलीसांनी केला आहे.
 
 
पोलीसांनी सामुहिक बलात्काराच्या घटनेला नकार दिला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास अजमेर (दक्षिण विभाग) मुख्य अधिकारी मुकेश कुमार यांना देण्यात आला आहे. बारा बलात्कार प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू होत आहे. राजस्थानमध्ये अशी बारा प्रकरणे दंडाधिकारीतर्फे पीडित महिलांचे जबाब नोंदवण्यात येणार आहे.
 
 
बुधवारी या प्रकरणी दोन बहिणींनी बलात्काराचा आरोप लावला होता. भाजपतर्फे काँग्रेसविरोधात या प्रकरणी आंदोलनही करण्यात आले. मात्र, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विट करत या प्रकरणी आरोप चुकीचे आहेत. असे म्हटले आहे.
 
 
 
जेव्हा कुटूंबियांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली तेव्हा पोलीसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. मात्र, दोन्ही मुलींनी दंडाधिकाऱ्यांसमोर आपला जबाब फिरवला होता. त्यावर वडिलांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. जबाब फिरवला नाही तर आई-वडिलांना मारून टाकू, अशी धमकी आल्याचे त्यांनी म्हटले आहे. दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब फिरवण्याचे हे कारण आहे, असे पीडितेचे वडिल म्हणाले.
 
 
 
पोलीसांना पुन्हा या प्रकरणी जबाब नोंदवण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणी आता कलम ३७६ लावण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीसांच्या भूमीकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. जर पोलीसांसमोर पीडितांनी आरोपींची माहिती दिली होती तर त्यांना मुक्त का करण्यात आले.
 
 
 
जिल्हा पोलीस अधिकारी डॉ. रवी यांच्या मते, मुलींच्या कुटूंबियांशी चर्चा झाली आहे. त्यांनी नव्याने तक्रार दाखल केली आहे. पुन्हा या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. आरोपींना लवकरच अटक करू, असे पोलीसांनी आश्वासन दिली आहे. या प्रकरणात हलगर्जीपणाचा आरोप असणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे.
 
 
 
हाथरस प्रकरणात आक्रमक झालेल्या काँग्रेस आणि राहुल गांधींनी राजस्थानातील या प्रकरणावर सोयीस्करित्या मौन बाळगले आहे. तर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी हाथरस प्रकरणाशी या प्रकरणाचा संबंध जोडला जाऊ नये, असे म्हटले आहे. राहुल गांधीही या प्रकरणी गप्प आहेत. पीडितेच्या कुटूंबियांवर ज्या प्रकारे दबाव टाकला जात आहे, असे खुद्द तिच्या वडिलांनीच सांगितली आहे.
@@AUTHORINFO_V1@@