अर्थव्यवस्था रुळावर! जीएसटी महसुल वधारला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Oct-2020
Total Views |
GST_1  H x W: 0
 
 


जीएसटी महसूलात सहा महिन्यांतील सर्वात जास्त वाढ

मुंबई : सप्टेंबर महिन्यात ९५ हजार ४८० कोटी रुपयांचा वस्तू व सेवा कर (जीएसटी) महसूल जमा झाला आहे. गेल्या सहा महिन्यांतील सर्वात जास्त महसूल आहे. मार्चमध्ये लॉकडाऊन लागू झाल्यापासून आत्तापर्यंतचा सर्वात जास्त महसूल सप्टेंबर महिन्यांतील आहे. सप्टेंबर महिन्यापासून अनलॉकची प्रक्रीया लागू करण्यात आली होती.
 
 
 
गत महिन्याच्या १०.४ टक्के जास्त महसूल
 
अर्थ मंत्रालयाने दिलेल्या आकडोवारीनुसार ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये जीएसटी महसुलात १०.४ टक्के जास्त वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात ८६ हजार ४४९ रुपयांचा महसूल गोळा झाला होता. गेल्या वर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेतून हा ४ टक्के जास्त महसूल आहे. एकूण महसूलानुसार केंद्राचा हिस्सा हा १७ हजार ७४१ कोटी इतका तर राज्यांचा २३ हजार १३१ कोटी हिस्सा आहे. आयजीएसटीचा हिस्सा ४७ हजार ४८४ कोटी रुपये इतका आहे
 
 
 
आयातीतून मिळाला २२ हजार ४४२ कोटींचा महसूल
 
आकडेवारीनुसार एकूण २२ हजार ४४२ कोटी महसूल आयातीमुळे मिळाला आहे. ७ हजार १२४ कोटी रुपये सेसच्या अंतर्गत मिळाले आहेत. सरकारने या दरम्यान २१ हजार २६० कोटी रुपये सीजीएसटी अंतर्गत तर १६ हजार ९९७ कोटी रुपये एसजीएसटी अंतर्गत रेग्युलर सेटलमेंट केले आहे. त्यानंतर ३९ हजार १ कोटी रुपये तर राज्यांनी ४० हजार १२८ कोटी रुपये कलेक्शन केले आहे. पाच ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जीएसटी आढावा बैठकीत राज्य सरकारे सहभागी होणार आहेत.
 
 
 
अनलॉकमुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा
 
जीएसटी महसुलातील वाढ अनलॉक प्रक्रीयेमुळे दिसत आहे. सुरुवातीला अनलॉकचे टप्पे सुरू केल्यानंतर आर्थिक व्यवहारांमध्ये गती मिळत आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांतूनही चांगली कामगिरी होत आहे. त्यामुळे देशाचा महसूल वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.


@@AUTHORINFO_V1@@