अपराध्यांना अशी शिक्षा जी भविष्यात उदाहरण ठरेल : योगी आदित्यनाथ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Oct-2020
Total Views |

yogi adityanath_1 &n


नवी दिल्ली  :
हाथरस सामुहिक बलात्काराने संपूर्ण देश हादरला आहे. यूपी सरकार काय लपवण्याचा प्रयत्न करतंय? असा संतप्त सवाल विचारला जाऊ लागला. देशभरातुन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उत्तरप्रदेश पोलिसांवर आरोप केले जात आहेत. अशातच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक महत्वपूर्ण ट्विट केलं आहे.
ते म्हणतात,"उत्तर प्रदेशातील माता-भगिनींचा सन्मान आणि स्वाभिमानाला ठेस पोहचविण्याची केवळ कल्पना करणाऱ्यांना देखील कठोर शासन केले जाईल. या अपराध्यांना अशी शिक्षा मिळेल जी भविष्यात एक उदाहरण ठरेल.उत्तरप्रदेश सरकार हे प्रत्येक माता भगिनींच्या सुरक्षा आणि विकासासाठी वचनबद्ध आहे. हा आमचा संकल्प आहे हे आमचं वचन आहे." असे ट्विट योगी आदित्यनाथ यांनी केले.




हाथरस कथित बलात्कार प्रकरणात काँग्रेस व विरोधी पक्षांनी देशात राजकारण तापवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान काल पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी याना ग्रेटर नोएडाजवळ पोलिसांनी रोखले. त्यानंतर काँग्रेसने या भागात ‘हायव्होल्टेज ड्रामा’ केला. उत्तर प्रदेशकडे कूच करण्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांसह निघालेल्या राहुल गांधी यांना नोएडा येथे पोलिसांनी अटक केली. यावेळी राहुल गांधी यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचाही आरोप काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आला, तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर लाठीमारही करण्यात आला. मात्र, कोरोना महामारीच्या काळातही शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी रस्त्यावर जमवून काँग्रेसला नेमके काय साध्य करायचे आहे? असा सवाल भाजपने करत काँग्रेसचा हादेखील एक दिखावा असल्याचा आरोप केला.


‘दोषींना लवकरात लवकर फासावर लटकवले जाईल’
“कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा राज्याच्या अखत्यारितला असून आपण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गृहमंत्रालयाच्या अधिकार्‍यांसोबत चर्चा केली आहे. दोषींना लवकरात लवकर फासावर लटकवले जाईल,” असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे बलात्कारी लवकरच फासावर लटकवले जातील, असा विश्वास वाटतो. त्याचप्रमाणे राष्ट्रीय महिला आयोगानेदेखील या घटनेची दखल घेतली आहे, असे मत केंद्रीय महिला व बालविकासमंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@