कमलनाथ थोडी शरम बाळगा ! : भाजपचे मुक आंदोलन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Oct-2020
Total Views |
Kamalnath_1  H


 महिला मंत्र्यांबद्दल वापरला आक्षेपार्ह शब्द

भोपाळ : मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांची एका भाषणा दरम्यान जीभ घसरली. महिलांना समसमान मानसन्मान देण्याच्या गोष्टी करणाऱ्या काँग्रेस नेत्याने मध्यप्रदेशच्या महिला आणि बाल विकास मंत्री इमरती देवी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भाजपसह बसप नेत्या मायावती यांनी या प्रकरणाचा निषेध नोंदवला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, ज्योतिरादित्य सिंधिया, गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यासह तमाम नेत्यांनी विविध शहरांमध्ये मौन धरणे आंदोलन केले जात आहे.
 
 
इमरती देवी यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कमलनाथ यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. काँग्रेसने सार्वजनिकरित्या या प्रकरणाची माफी मागावी, असे म्हटले आहे. कमलनाथ यांनी रविवारी डबरा येथील निवडणूक सभेत इमरती देवी यांचा उल्लेख आयटम, असा केला. त्याविरोधात शिवराजसिंह यांनी जुन्या विधानसभा येथे गांधींच्या प्रतिमेसमोर मौन धरणे आंदोलन सुरू केले आहे. राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनीही इंदौरमध्ये तर भाजप प्रदेश अध्यक्ष वीडी शर्मा ग्वाल्हेरमध्ये मौन उपोषण सुरू केले आहे.
 
 
 
महिला आयोगाने पाठवली नोटीस
 
राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष रेखा शर्मा यांनी ट्विट करत कमलनाथ यांना नोटीस बजावले आहे. त्यासह निवडणूक आयोगाला पत्र लिहून याबद्दल सूचना दिली आहे. ग्वाल्हेर विभाग पक्ष प्रवक्ते के के मिश्रा यांनी या प्रकरणी सारवासारव करत कमलनाथ यांनी कुठल्याही महिलेचा अवमान केला नसल्याचे म्हटले आहे.

 
 
हा इथल्या माताभगीनींचा आणि मुलींचा अवमान - मुख्यमंत्री
 
मुख्यमंत्री शिवराज यांनी म्हटले की मी माझा अवमान सहन करेन मात्र, कमलनाथ यांनी ज्या प्रकारे महिलांचा इथल्या माता भगीनींचा अवमान केला आहे तो सहन केला जाणार नाही. ग्वाल्हेर चंबलच्या मातीतील एक भगिनी आणि मुलीचा हा अवमान आहे. इमरती देवी यांचा जन्म एका गरीब कुटूंबात झाला आहे. मोलमजूरी करून त्यांनी सुरुवातीचे आयुष्य व्यथित केले आहे. कठोर संघर्षातून त्या राजकारणात आल्या. मंत्री झाल्या. एका मागासवर्गीय समाजातून येणाऱ्या महिलेचा असा अवमान विरोधक करत आहेत. कमलनाथ यांनी थोडी शरम बाळगायला हवी. तुम्ही कोणाचा अवमान करत आहात, स्वतःला काय समजता ?



 
 
इमरती म्हणाल्या...
 
रविवारी रात्री भोपाळमध्ये बोर्ड ऑफिस येथे भाजपने कमलनाथ यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करत आंदोलन केले. हे लोक मध्य प्रदेशातील जनतेला ओळखत नाहीत. त्यांना इथल्या मुलींचा सन्मान करणे जमत नसेल तर इथे राहण्याचा अधिकार नाही. अशी टीपण्णी करणे हे अवमानजनक आहे.
 


 
काय आहे नेमके प्रकरण
 
रविवारी ग्वाल्हेर जिल्ह्यातील डबरा विधानसभेच्या जागेवर काँग्रेस उमेदवार सुरेश राजे यांच्या समर्थनात माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाषण केले. त्यांनी भाजप उमेदवार आणि मंत्री इमरती देवी यांचे नाव घेणेही उचित समजले नाही. आमचे उमेदवार सुरेश राजे हे सरळ साधे आहेत. हे तिच्यासारखे नाहीत. मी तिचे नाव का घेऊ, त्यावर जमलेल्यांनी इमरती देवी यांचे नाव घेतले. यावर कमलनाथ यांनी कुत्सितपणे हसत याबद्दल प्रतिक्रीया दिली. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त जाणकार आहात. तुम्ही मला यापूर्वीच सावध करायला हवे होते. की काय आयटम आहे...















CMO_1  H x W: 0
@@AUTHORINFO_V1@@