लॉकडाऊन नसता तर २५ लाख कोरोनाबळी गेले असते

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Oct-2020
Total Views |
PM Modi_1  H x



आनंदवार्ता : फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोरोना संपणार

 
नवी दिल्ली : कोरोना विषाणू महामारीच्या विळख्यात संपूर्ण देश अडकला आहे. गेल्या २४ तासांत एकूण ५५ हजार कोरोना रुग्ण आढळले आहेत. कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होत आहे. रविवारी एकूण ६६ हजार ४१८ रुग्ण बरे झाले. ५१८ जणांचा मृत्यू झाला. यातच दिलासादायक बाब म्हणजे फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोरोना देशातून हद्दपार होईल, असा विश्वास सरकारतर्फे तयार करण्यात आलेल्या वैज्ञानिकांच्या नॅशनल सुपरमॉडेल समितीने व्यक्त केला आहे. 
 
 
सप्टेंबरमध्ये कोरोनाची लाट येऊन गेली, जर देशात लॉकडाऊन लागला नसता तर २५ लाख लोकांचा कोरोनाने बळी घेतला असता, असेही मत व्यक्त करण्यात आले आहे. हा विश्वास व्यक्त करणाऱ्या समितीत हैदराबाद आणि आयआयटी कानपूरसह नामांकीत इंस्टीट्युटच्या विशेषज्ज्ञांचा सामावेश आहेत. भारतात कोरोना विषाणू महामारीने आत्तापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. जगभरात या विषाणूने थैमान घातले. सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार के.विजयराघवन यांनी या समितीचे गठण केले आहे. आयआयटी हैदराबादचे प्राध्यापक एम विद्यासागर हे प्रमुख आहेत.
 
 
 
समितीच्या मते, भारतात मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर केला नसता तर २५ लाखांहून अधिक जणांनी आपला जीव गमावला असता. कोरोना महामारीमुळे १ लाख १४ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. नीति आयोग सदस्य डॉ.वीके पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यांमध्ये नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले आहेत. तसेच मृतांची आकडेवारीही घटली आहे. मात्र, हिवाळ्यात आपण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही, असेही ते म्हणाले. 
 
 
 
कोरोनाची लस आल्यानंतर देशभरात ती पोहोचवण्यासाठी आपल्याकडे व्यवस्था आहे. मात्र, पूर्वीपेक्षा आता स्थिती बरी आहे. आपल्याला आणखी लांबचा पल्ला गाठायचा आहे. कारण ९० टक्के लोकसंख्या आजही कोरोनाच्या विळख्यात सापडू शकते.
सरकारर्फे बनवण्यात आलेल्या या वैज्ञानिक समितीने आशावाद व्यक्त केला आहे. फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोरोना हद्दपार होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतात १ कोटी ६ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढणार नाही, असा विश्वास या समितीला आहे. भारतात सध्या कोरोनाचे एकूण ७५ लाख रुग्ण आहेत. या समितीने महामारीचा आढावा घेण्यासाठी कॉम्प्युटर मॉडेलचा वापर केला जाणार आहे. 
 
 
 
देशात लॉकडाऊन विनाकारण लावला, अशी टीका कायम विरोधकांकडून केली जाते. यामुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, असाही आरोप केला जातो. मात्र, जर लॉकडाऊन आणि निर्बंध लादण्यात आले नसते तर आपण देशातील २५ लाख जनसंख्या गमावली, असती अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही अद्याप पूर्णपणे अनलॉकची प्रक्रीया सुरू झालेली नाही. अनेक गोष्टींवर अजूनही बंधने कायम आहे. 


@@AUTHORINFO_V1@@