‘कोरोना’चा प्रतिबंध आणि रोगप्रतिकारकशक्ती : कोरोनाचा कहर (भाग २९)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Oct-2020
Total Views |

covid_1  H x W:


रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी या जीवनसत्त्व व क्षारांचा नक्कीच हातभार लागतो. परंतु, फक्त याचमुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते हे म्हणणे तितकेसे बरोबर नाही. रोगप्रतिकारकशक्ती म्हणजे नक्की आहे तरी काय, याची थोडक्यात माहिती असणे गरजेचे आहे.



कोरोना व इतर कुठल्याही आजाराला रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे रोगप्रतिकारकशक्ती किंवा इम्युनिटी. आपण सर्वजण ही रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. अ‍ॅलोपॅथीक औषधशास्त्रानुसार ‘क’ जीवनसत्त्व व झिंकच्या गोळ्या घेतल्या की, तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढेल, असे सांगितले जाते. जवळजवळ सर्वच लोक ही जीवनसत्त्वे खात आहेत. परंतु, तरीही लाखो लोक रोज या कोरोना व इतर आजारांनी ग्रस्त आहेत. म्हणजेच काय, तर खरंच या जीवनसत्त्वाने ‘इम्युनिटी’ वाढते का, हा मोठा प्रश्न आहे. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी या जीवनसत्त्व व क्षारांचा नक्कीच हातभार लागतो. परंतु, फक्त याचमुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते हे म्हणणे तितकेसे बरोबर नाही. रोगप्रतिकारकशक्ती म्हणजे नक्की आहे तरी काय, याची थोडक्यात माहिती असणे गरजेचे आहे.



covid_1  H x W:


रोगप्रतिकारकशक्ती किंवा ‘इम्युनिटी’ म्हणजे शरीराचे रोगकारक व हानिकारक जीवाणूंपासून व घटकांपासून होत असलेले संरक्षण. रोगप्रतिकारकशक्ती ही शरीरातील संरक्षक पेशींमुळे तयार होत असते. ही एक अतिशय गुंतागुंतीची संस्था आहे. जिच्यामध्ये हल्लीच्या भाषेत सांगायचे झाले, तर एक प्रकारचे ‘सेंर्सस’ बसवलेले असतात. ज्यामुळे स्वतःच्या शरीराच्या व मनाच्या व प्रकृतीच्या गोष्टी कुठल्या व बाहेरील गोष्टी कुठल्या, हे जाणण्याची ताकद व संवेदनक्षमता त्या संस्थेमध्ये येते व मेंदूच्या नसांच्या नियंत्रणातून या सर्व हानिकारक व अपायकारक गोष्टींचा छडा लावला जातो. तसेच त्यांच्यावर संरक्षक पेशींद्वारे नियोजित हल्ला करुन ते जीवाणू वा जंतू नष्ट केले जातात. जीवंत प्राण्याच्या शरीरात ज्या संरक्षक पेशी असतात, त्यात पांढर्‍या रक्तपेशी (श्वेतपेशी) असतात.



covid_1  H x W:
त्याचबरोबर ‘लिम्फोबाईट्स’सुद्धा संरक्षक पेशी म्हणून महत्त्वाचे कार्य करतात. आपण नेहमी रक्ताच्या रिपोर्टमध्ये जे बघतो ज्यात पांढर्‍या पेशी (leukocyte) बरोबर ज्यट्रोसिनोफिल्स (Neutrophils ), लिम्फोसाईट्स (Lymphocytes ), इओलिनोफिलस (Eosinophils), मोनोसाईट्स (Monocytes) व बेसोफिल्स (Basophils) अशा प्रकारच्या पेशींबद्दल आपण वाचत असतो. या सर्व पेशी या माणसाची संरक्षण क्षमता वाढवणार्‍या पेशी आहेत. ठराविक प्रकारच्या जंतुसंसर्गात ठराविक पद्धतीच्याच पेशी सर्व प्रथम लढावयास जातात व म्हणूनच जंतुसंसर्गाध्ये बर्‍याचदा पांढर्‍या पेशींची मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आपल्याला दिसून येते. जेवढ्या प्रमाणात ही वाढ जास्त तेवढ्या प्रमाणात संसर्ग जास्त असतो. रोगप्रतिकारकशक्ती ही माणसाच्या संवेदनशीलतेवरही मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. संवेदनशीलता व प्रतिकारशक्ती कमकुवत झाली की आपोआपच रोगाला आमंत्रण मिळते. रोग होण्यास त्या माणसाला आजूबाजूची परिस्थितीसुद्धा तितकीच महत्त्वाची असते. म्हणजेच काय, तर रोगप्रतिकारकशक्ती ही नुसती जीवनसत्त्वे घेतल्यामुळे वाढत नाही तर जीवनशैली सुधारण्यामुळे वाढते. ही जीवनशैली कशी सुधारायची हे आपण पुढे पाहणारच आहोत.


covid_1  H x W:

- डॉ. मंदार पाटकर
(लेखक एम.डी. होमियोपॅथी आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@