पाहणी दौरे नको थेट मदत करा! शेतकऱ्यांची मागणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Oct-2020
Total Views |
Pawar Uddhav Thackeray_1&

 

नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

 
नांदेड : राज्यात अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कालपासून सर्व मंत्र्यांची आणि नेत्यांची लगबग सुरू आहे. शरद पवारांपासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता बांधावर पोहोचले आहेत. परतीच्या पावसामुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि विविध नेतेमंडळी शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी दौरा करणार आहेत मात्र, सरकारमधल्या मंडळींनी पाहणी करण्यापेक्षा थेट मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
 
 
 
नांदेडच्या कंधार तहसील कार्यालयावर यावेळी मोर्चा काढण्यात आला. ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना तातडीने मदत सुरू करा, पूरामुळे झालेल्या नुकसानीसाठी पूर्नवसन कार्य तत्काळ सुरू करा, अशी प्रमुख मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही अशाप्रकारच्या विरोधाला सामोरे जावे लागले. पवार दौऱ्यावर असताना जालना जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
 
 
दरम्यान, शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांसह सर्वपक्षीय नेते राज्यातील विविध भागांत दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली मात्र, मदतीची घोषणा आता करणार नसल्याचे म्हटले आहे. प्रत्येक समस्येचा आढावा घेऊन त्याप्रमाणे मदत जाहीर करणार असल्याचे ते म्हणाले.



@@AUTHORINFO_V1@@